IRCTC आणि Paytm ने डिजिटल तिकीट सेवेसाठी भागीदारी केली आहे. आता रेल्वे प्रवासी डिजिटल व्यवहारांद्वारे जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक स्मार्ट पास रिचार्ज करू शकतील. ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनसाठी (ATVM) ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असेल. ज्याद्वारे प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करून तिकीट काढता येणार आहे. तसेच देशातील बहुतांश प्रमुख रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत.
ATVM म्हणजे काय?
ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन हे टच स्क्रीनवर आधारित तिकीट किओस्क आहे. ज्याद्वारे प्रवासी आपोआप प्रक्रिया करून तिकीट मिळवू शकतात. ATVM वर पेमेंट करण्यासाठी QR कोड देखील असेल. जे डिजिटल पेमेंट करण्यात मदत करेल. ATVM च्या माध्यमातून प्रवाशांना अनारक्षित रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मासिक स्मार्ट कार्ड रिचार्ज यांसारख्या सुविधांचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे.
डिजिटल व्यवहारांसाठी पेटीएम हा पर्याय दिला गेला आहे.
पेटीएम एटीव्हीएमद्वारे तिकिटे मिळविण्यासाठी अनेक पेमेंट पर्याय ऑफर करणार आहे. ज्यामध्ये तुम्ही पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता.
यावेळी पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, “भारतात QR कोड क्रांतीचा मार्ग पत्करल्यानंतर, रेल्वे स्थानकांवर तिकीट करणे सुलभ करून हे आणखी पुढे नेण्यात आम्हाला आनंद होत आहे. IRCTC सह आमच्या भागीदारीसह, आम्ही भारतीय रेल्वेच्या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनसाठी पेटीएम क्यूआर सोल्यूशन आणत आहोत. यामुळे प्रवाशांना पूर्णपणे कॅशलेस प्रवास करता येणार आहे.
ATVM वर डिजिटल व्यवहार कसे करावे
जवळच्या रेल्वे स्टेशनवर गेल्यावर एटीव्हीएम मशीनजवळ जा.
त्यानंतर पेटीएम पेमेंट पर्याय निवडा.
तुमच्या स्मार्टफोनने QR स्कॅन करा आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर एटीव्हीएमवरून तिकीट किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज केले जाईल.