काही तांत्रिक कारणांमुळे IRCTC वेबसाईट आणि अॅपवर तिकीट बुकिंगची सेवा डाउन झाली आहे. त्यामुळे वेबसाईट आणि अॅपवर तिकीट बुक करण्याऱ्या लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हजारो प्रवाशांना तिकीट बुक करण्यास अडचण येत आहे. त्यातच आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट ट्वीट केली आहे. त्यात ”तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची टेक्निकल टीम समस्येचे निराकरण करत आहे. तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही सूचित करू. ”
वेबसाईटवर IRCTC मेसेजमध्ये लिहिले आहे की, ”मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे ई-तिकीटिंग सेवा उपलब्ध नाही. कृपया नंतर प्रयत्न करा.” यामध्ये पुढे म्हणण्यात आले आहे, ”फाईल TDR रद्द करण्यासाठी कृपया कस्टमर नंबरवर १४६४६,०७५५-६६१०६६१ आणि ०७५५-४०९०६०० वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा.” याबाबतचे वृत्त zeenews ने दिले आहे.