IRCTC Ticket Booking : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी अधिकतर लोक IRCTC चा वापर करतात. यापूर्वी एका IRCTC युजर आयडीवरून फक्त ६ तिकिटे बुक करता येत होती. त्यामुळे ग्रूपने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना सहा पेक्षा जास्त लोकांची तिकिटे बुक करण्यासाठी अडचणी येत होत्या. पण आता काळजी करू नका. तिकिटे बुक करण्याची ही मर्यादा वाढवून आता दुप्पट म्हणजेच १२ इतकी करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने सोमवारी ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमाबाबत घोषणा केली.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइट आणि अॅपद्वारे बुक केलेल्या रेल्वे तिकिटांची संख्या वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ आता पूर्वीपेक्षा जास्त तिकिटे एका आयडीने ऑनलाइन बुक करता येणार आहेत. रेल्वे तिकिट बुकिंगसंदर्भातील नियमात बदल करून प्रवाशांना मोठाच दिलासा दिला आहे. यामुळे प्रवाशांना आता जास्त तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे.

आणखी वाचा : पाण्यात पडल्यानंतरही बिघडणार नाही! कॉलिंगसह ‘हे’ स्मार्टवॉच भारतात लॉन्च, बॅटरी १४ दिवस चालेल

त्याचबरोबर आधारशी लिंक केलेला युजर आयडी वापरणारे युजर्स आता एका महिन्यात १२ ऐवजी २४ तिकिटे बुक करू शकतील. बुक केलेल्या प्रवाशांपैकी एकाचा आधार देखील IRCTC आयडीने पडताळला जाणं गरजेचं आहे.

नुकतेच रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून लोकांना ट्रेनमध्ये प्रवास करताना जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. नवीन नियमांची घोषणा करताना रेल्वेने सांगितले होते की, विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वे प्रवाशांनाही जास्त सामान नेण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

आणखी वाचा : रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये स्पर्धा : अनलिमिटेड डेटा, कॉल आणि OTT अ‍ॅप्स एका महिन्यासाठी मोफत

जास्त प्रवास करणाऱ्यांना फायदा
रेल्वेच्या या नव्या निर्णयाचा फायदा त्या प्रवाशांना होणार आहे जे अनेकदा रेल्वेने प्रवास करतात. यापूर्वी कमी मर्यादेमुळे युजर्स अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकत नव्हते, परंतु नवीन मर्यादा आल्यानंतर आधीपेक्षा जास्त तिकीट बुकिंग IRCTC अ‍ॅप किंवा IRCTC वेबसाइटवरून सहज करता येईल.

तिकिट बुकिंग कोटा संपल्यानंतर बहुतेक रेल्वे प्रवासी रेल्वेच्या खिडकीतून तिकीट बुक करत असत. पण आता आधार लिंक केलेल्या आयडीसाठी तिकीट बुकिंग कोटा १२ वरून २४ करण्यात आला आहे. म्हणजेच प्रवाशांना आता त्यांच्या युजर आयडीने त्यांना हवे तेव्हा तिकीट बुक करता येणार आहे आणि त्यांना तिकीट खिडकीवर किंवा रेल्वे एजंटकडे फिरावे लागणार नाही.

Story img Loader