भारतात ५जी नेटवर्क लाँच करण्यात आल्यानंतर लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी ही सुविधा उपलब्ध करण्यास सुरूवाट केली. एअरटेल आणि जिओने ५जी सेवा काही शहरांमध्ये रोल आऊट केली आहे. पुढच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण देशात ५जी सेवा उपलब्ध होणार आहे. पण सध्या ज्या व्यक्तींना ही सुविधा उपलब्ध आहे, त्यांना या हाय स्पीड नेटवर्कमुळे फोनची बॅटरी लवकर संपत असल्याचा अनुभव आला आहे.

नॉन स्टॅंडअलोन ५जी सेवेमध्ये हाय स्पीड ५जी इंटरनेट उपलब्ध होते, पण कॉल आणि मेसेजेससाठी ४जी सेवेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या स्पीडचे नेटवर्क वापरल्यामुळे फोनची बॅटरी लगेच संपते, असा अनुभव अनेक युजर्सना आला आहे. यावर कोणता उपाय करता येईल आणि फोनची बॅटरी कशी वाचवता येईल जाणून घ्या.

आणखी वाचा : व्हॉटसअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचाय? याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

अँड्रॉइड फोनमध्ये ५जी नेटवर्क वापरताना बॅटरी वाचवण्याचे उपाय

  • बॅटरी वाचवण्यासाठी फोनमधील नेटवर्क सेटिंग बदलावी लागेल.
  • यासाठी डिवाइस सेटिंगमध्ये जा, त्यामध्ये मोबाईल नेटवर्क पर्यायामध्ये जा.
  • त्यांनंतर तुम्हाला हवे ते नेटवर्क (४जी किंवा ५जी) निवडू शकता.

आयफोनमध्ये ५जी नेटवर्क वापरताना बॅटरी वाचवण्याचे उपाय

  • ‘५जी’ ऑटो हा पर्याय वापरून तुम्ही आयफोनमध्ये बॅटरी वाचवु शकता.
  • त्यासाठी सेटींग्समध्ये जाऊन मोबाईल डेटा पर्याय निवडा, त्यामध्ये ‘व्हॉइस अँड डेटा’ हा पर्याय निवडा.
  • तिथे ५जी ऑटो हा पर्याय दिसेल.
  • हा पर्याय निवडल्यानंतर ५जी नेटवर्क तेव्हाच वापारले जाईल जेव्हा ५जी नेटवर्कचे सिग्नल उत्तम असेल, अशाप्रकारे बॅटरीची बचत केली जाईल.