WhatsApp Security: स्मार्ट फोन वापरणारा प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सॲपचा वापर हमाखास करतो. खाजगी चॅट्स, कॉल्स आणि मित्र आणि कुटुंबासह महत्त्वाच्या संभाषणांसाठी वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप अत्यंत लोकप्रयित आहे. व्हॉट्सॲप वापरकर्त्याचा अनुभव आणि सहभाग वाढविण्यासाठी सतत त्यात नवनवीन वैशिष्ट्ये जोडली जातात. तुमच्या व्हॉट्सॲपवर तुम्हाला कधी असामान्य अॅक्टिव्हिटी दिसली आहे का? जसे की, तुम्हाला आठवत नसलेले मेसेज कोणालातरी पाठवणे, विचित्र वेळी ऑनलाइन स्टेटस बदलणे किंवा तुमच्या व्हॉट्सॲप खात्याशी अनोळखी डिव्हाइसेबरोबर जोडलेले आहे?

व्हॉट्सॲप लाखो लोकांसाठी संवादाचे प्राथमिक माध्यम असल्याने त्याच्या सुरक्षितेचे उल्लंघन चिंताजनक असू शकते. व्हॉट्सॲप खात्याचा अनधिकृत प्रवेश एखाद्याला मिळाल्यास वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन, डेटा चोरी आणि अगदी आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते. जर तुम्हाला कोणीतरी तुमचे व्हॉट्सॲप वापरत असल्याचा संशय असेल, तर जलद कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पण व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटा संदेश आणि कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुनिश्चित करते, हॅकर्स किंवा अनधिकृत वापरकर्त्यांकडे तुमचे लॉगिन तपशील असल्यास ते तुमचे खाते अॅक्सेस करू शकतात. हे टाळण्यासाठी, जर तुमचे व्हॉट्सॲप खाते अनोळखी डिव्हाइसवर वापरले जात असले त्यांचा अॅक्सेस काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग आहे.

तुमचे व्हॉट्सॲप कोण वापरत आहे? ( Who’s Using Your WhatsApp? )


WhatsApp मध्ये एक बिल्ट-इन लिंक्ड डिव्हाइसेस फीचर आहे जे तुम्हाला तुमचे खाते कुठे लॉग इन केले आहे ते पाहण्याची परवानगी देते. जर तुम्हाला एखादे डिव्हाइस आढळले जे तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही ते लगेच काढून टाकू शकता.

लिंक्ड डिव्हाइसेस फीचर म्हणजे काय? (What Is Linked Devices Feature )

WhatsApp चे लिंक्ड डिव्हाइसेस फीचर तुम्हाला तुमचे WhatsApp खाते तुमच्या फोन, संगणक किंवा टॅबलेटसह अनेक डिव्हाइसेसवर वापरण्याची परवानगी देते. तुम्ही एकाच वेळी चार डिव्हाइसेस तुमच्या प्राथमिक फोनशी लिंक करू शकता.

WhatsApp मधून अज्ञात डिव्हाइसेस कसे काढायचे (How To Remove Unknown Devices From WhatsApp)

  • स्टेप १: तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.
  • स्टेप २: वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन-डॉट मेनूवर टॅप करा.
  • स्टेप ३: मेनूमधून “लिंक्ड डिव्हाइसेस” निवडा.
  • स्टेप ४: तुमचे WhatsApp खाते सक्रिय असलेल्या सर्व डिव्हाइसेसची सूची पहा.
  • स्टेप ५: Android, Windows किंवा ब्राउझर सत्रांसारखे डिव्हाइस तपशील तपासा.
  • स्टेप ६: अपरिचित डिव्हाइसेसवर टॅप करून आणि “लॉग आउट” निवडून ते काढून टाका.

तुमचे WhatsApp खाते कसे सुरक्षित करावे? (How To Secure Your WhatsApp Account )

  • स्टेप १: सेटिंग्ज > अकाऊंट > टु स्टेप व्हेरिफिकेशन वर जा आणि अतिरिक्त सुरक्षिततेसाठी पिन सेट करा.
  • स्टेप २: लिंक्ड डिव्हाइसेस अंतर्गत कोणतेही अज्ञात डिव्हाइस लॉग इन केलेले नाहीत याची खात्री करा आणि कोणतेही संशयास्पद डिव्हाइस काढून टाका.
  • स्टेप ३: अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे किंवा पडताळणी न केलेल्या संपर्कांसह वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.
  • स्टेप ४: WhatsApp वर अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी एक मजबूत पासवर्ड, फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस आयडी सेट करा.
  • स्टेप ५: सुरक्षा भेद्यता आणि नवीन धोक्यांपासून (security vulnerabilities and new threats) संरक्षण करण्यासाठी नेहमीच नवीनतम आवृत्तीवर (version) अपडेट करा.

Story img Loader