Gmail storage Free: जीमेल अकाऊंट हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय ईमेल सेवा आहे. पण आपल्यापैकी अनेकांना जीमेल अकाऊंटमधील स्टोरेजच्या समस्येला सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपल्याला जीमेल अकाऊंटचे स्टोरेज फुल्ल झाल्याची सूचना मिळते आणि नवीन मेल मिळवण्यासाठी आपल्याला जुने मेल डिलीट करावे लागतात. Google द्वारे वापरकर्त्यांना एकूण १५ जीबी विनामूल्य स्टोरेज दिले. हे स्टोरेज Drive, Emails, WhatsApp Backup यासह इतर अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. तुमच्याकडे Android फोन असल्यास, १५ जीबी स्टोरेज अगदी सहज फुल्ल होते.

स्टोरेज फुल्ल होण्यासंबंधीचे अनेक प्रश्न Google Forums मध्ये येतात. या प्रश्नाचे सर्वात सामान्य उत्तरे आहे. पहिल्या उत्तरात Google कडून १३० रुपये प्रति महिना देऊन १०० जीबी क्लाउड स्टोरेज खरेदी करा. दुसऱ्या उत्तरात गुगल अकाउंटची स्टोरेज जागा साफ करण्यास सांगितले आहे.

desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्यासाठी, तुम्ही प्रथम खरेदी करू इच्छित असलेली स्टोरेज रक्कम निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड तपशील टाकून स्टोरेजसाठी पैसे देऊ शकता. हे केल्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन योजनेच्या कालावधीसाठी अतिरिक्त जागा मिळेल.

याशिवाय, नवीन ईमेल मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमचे अकाऊंटचे स्टोरेज मोकळे करावे लागेल आणि अकाऊंटस्टोरेज १५ जीबीपेक्षा कमी असावे लागेल. तीन सोप्या मार्गांनी तुम्ही Google अकाऊंटची जागा मोकळी करू शकता. तुम्ही Google Drive, Google Photos आणि Mail मधील आकारानुसार फाइल हटवून जागा मोकळी करू शकता.

गुगल ड्राइव्हमधील आकारानुसार फाइल्स हटवा

  • डेस्कटॉप पीसीवर, https://drive.google.com/#quota वर जा.
  • आता तुमच्या जीमेल अकाऊंटमध्ये लॉगिन करा.
  • यानंतर, ज्या फाईलने जास्त जागा वापरली आहे ती प्रथम प्रदर्शित होईल. म्हणजेच तुमच्या फाईल्स उतरत्या क्रमाने दिसू लागतील.
  • आता तुम्हाला गरज नसलेल्या फाईल्स तुम्ही कायमस्वरूपी हटवू शकता.

हेही वाचा – Tech Tips: रिमोट हरवलाय? काळजी करू नका; स्मार्टफोनद्वारे कंट्रोल करा टीव्ही, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

जीमेल हटवा

  • प्रथम Gmail.com वर जा आणि आपल्या Google अकाऊंटमध्ये लॉग इन करा
  • आता शोध बारवर जा आणि “has:attachment larger:10M” शोधा.
  • त्यानंतर तुम्हाला १० एमबी आकारापेक्षा मोठ्या संलग्नकांसह सर्व ईमेलची सूची दिसेल.
  • आता तुम्हाला आवश्यक नसलेले ईमेल निवडा आणि डिलीट बटणावर टॅप करा
  • यानंतर ट्रॅशमध्ये जा आणि तुमच्या अकाऊंटमध्ये जागा साफ करण्यासाठी empty trash button बटणावर टॅप करा.
  • आता डाव्या नेव्हिगेशन बारमधील स्पॅम फोल्डरवर जा
  • आता ‘Delete all spam messages’ वर क्लिक करा आणि नंतर खात्रीपूर्वक क्लिक करा.

हेही वाचा – Gmail युजर्ससाठी खुशखबर! आता कॉपी-पेस्टशिवाय ट्रान्सलेट करता येणार ईमेल, लॉन्च झाले ‘हे’ फिचर

Google Photos मधील स्टोरेज कसे मोकळे करावे

  • प्रथम तुमच्या कॉम्प्युटरवर https://photos.google.com/settings ला भेट द्या
  • त्यानंतर तुमच्या गुगल अकाउंटमध्ये लॉगिन करा
  • आता अपलोड गुणवत्ता मूळवरून उच्च गुणवत्तेत बदला
  • यानंतर Google तुम्हाला स्टोरेज रिकव्हर करण्यास सांगेल. त्यानंतर तुमचे आधीच अपलोड केलेले फोटो उच्च गुणवत्तेत रूपांतरित केले जातील आणि जागा वाचवण्यास मदत करतील.