Smartphone Tricks: Xiaomi ही भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी आहे. त्यामुळे काहीजण त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करून त्याच नावाने बनावट फोन बनवतात. सर्वात मोठी गोष्ट असे म्हणता येईल की हा बनावट फोन तुम्हाला वापरण्यात वेगळा दिसणार नाही. हा स्मार्टफोन हुबेहूब खऱ्या Xiaomi च्या फोन प्रमाणेच असतो. तुम्ही हे देखील लक्षात घेतले असेल की अनेक वेळा तुम्हाला Facebook किंवा Google वर नोटिफिकेशन्स मिळतात जिथे फोन अगदी कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असतात. किंमत पाहून तुम्हीही विचार न करता तो फोन खरेदी करता पण तो फोन खरा आहे की नाही याची पडताळणी आपण करत नाही. ऑफलाइन स्टोअर्सचीही अशीच स्थिती आहे. येथे अनेक दुकानांमध्ये बनावट फोनही मिळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही फोन विकत घेत असाल आणि तो खरा आहे की बनावट याबाबत जराही शंका असेल तर तुम्ही तो सहज तपासू शकता. Xiaomi ने खासकरून आपल्या यूजर्सना ही सुविधा दिली आहे. जर तुमच्याकडे Xiaomi फोन असेल तर तुम्ही तो खरा आहे की खोटा हे तपासू शकता.
Smartphone Tricks: तुमचा Xiaomi फोन डुप्लिकेट तर नाही ना? अशाप्रकारे करा पडताळणी
Xiaomi ने खासकरून आपल्या यूजर्सना ही सुविधा दिली आहे. जर तुमच्याकडे Xiaomi फोन असेल तर तुम्ही तो खरा आहे की खोटा हे तपासू शकता.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-07-2022 at 12:57 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is your xiaomi phone duplicate check this way gps