ISRO Aditya L1 Solar Mission Launch : चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ‘आदित्य एल१’ यान सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सूर्याकडं झेपावणार आहे. ‘आदित्य एल१’ चा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे. ‘आदित्य एल१’ बाबत प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत…

Live Updates

Aditya L1 Mission Launch Today : ‘आदित्य एल१’ प्रक्षेपणाची प्रत्येक अपडेट जाणून घ्या...

14:35 (IST) 2 Sep 2023
Aditya-L1 ची पृथ्वी भोवतालची कक्षा उद्या रविवारी आणखी वाढवली जाणार...

Aditya-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर तासभरातच इस्रोने नवी माहिती दिली आहे. उद्या म्हणजे रविवारी ११ वाजून ४५ मिनिटांनी यानाची कक्षा आणखी वाढवली जाणार आहे. सध्या आदित्य एल१ हे यान पृथ्वी भोवती २३५ बाय १९,५०० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. उद्या आणखी वरच्या कक्षेत म्हणजेच पृथ्वीपासून आणखी जास्त अंतरावरुन हे यान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. यासाठी यानावर असलेली इंजिनांचे काही मिनिटे प्रज्वलन केले जाणार आहे. ही माहिती देतांनाच यानाच्या प्रक्षेपणाचे सुंदर असे फोटोही ISRO ने प्रसिद्ध केले आहेत.

https://twitter.com/isro/status/1697880031639564776?s=20

13:06 (IST) 2 Sep 2023
Aditya L1 चा पुढील प्रवास कसा असेल?

Aditya L1 हे नियोजित कक्षेत पोहचले आहे आणि यानाने आता पृथ्वीभोवती २३५ बाय १९,५०० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीचे काही दिवस Aditya L1 ची पृथ्वी भोवतालची कक्षा वाढवण्यात येईल आणि त्यानंतर यानाचा पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या L1 या नियोजित ठिकाणी प्रवास सुरु होईल. तिथे पोहचण्यासाठी यापुढे आता १२५ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

12:57 (IST) 2 Sep 2023

"सूर्याचा शोध घेणाऱ्या 'आदित्य एल१' या अंतराळ मोहिमेतून एका नव्या संशोधनपर्वाचा प्रारंभ होणार आहे आणि त्यावर आपल्या भारत देशाची मोहोर उमटणार आहे. आदित्य एल वन या यानासोबतची उपकरणे अवकाशातील सौरवादळे व त्यांच्या अवकाशातील हवामानावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास करणार आहेत. या मोहिमेमुळे, सूर्याचा वेध घेणाऱ्या देशांच्या मालिकेत भारताचे नाव मोठ्या सन्मानाने समाविष्ट होईल. याआधीच्या मंगळ मोहिमेमुळे आणि नुकत्याचा यशस्वीपणे पार पाडलेल्या चंद्रमोहिमेच्या अनुभवामुळे ही मोहीम यशस्वी करण्याचा इस्रोचा आत्मविश्वास बळावला आहे. इस्रोच्या या आत्मविश्वासाला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने लाख शुभेच्छा. चांद्रयानाप्रमाणेच भारताची ही सौरयान मोहीम यशस्वी ठरेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचा झेंडा दिमाखाने फडकत राहील, असा विश्वास आहे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांना हार्दिक शुभेच्छा," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

https://twitter.com/mieknathshinde/status/1697868481625219518

12:41 (IST) 2 Sep 2023
Aditya L1 च्या प्रक्षेपणावर कधी शिक्कामोर्तब होणार ?

११ वाजून ५० मिनिटांनी PSLV-C57 ने अवकाशात झेप घेतली आहे. Aditya L1 हे मुख्य यानापासून वेगळं होण्यासाठी पुढील ६३ मिनिटे वाट पहावी लागणार आहे. म्हणजेच साधारण १२ वाजून ५३ मिनिटांनी इस्रो Aditya L1 यान हे अवकाशात यशस्वीपणे पोहचलं आहे की नाही याची घोषणा करणार आहे. आत्तापर्यंत तरी यानाचा प्रवास हा सुरळीत सुरु आहे. पृथ्वीपासून ६४८ किलोमीटर उंचीवर हे यान शेवटच्या टप्प्यापासून वेगळं होणार आहे.

12:32 (IST) 2 Sep 2023
'आदित्य एल१'चं यशस्वी प्रक्षेपण, गृहमंत्री अमित शाहांनी केलं कौतुक; म्हणाले...

"'आदित्य एल१'चं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, असं गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीगडमध्ये बोलताना म्हटलं.

https://twitter.com/ANI/status/1697865262345974127

11:57 (IST) 2 Sep 2023
Aditya L1 च्या प्रवासाला सुरुवात...

जगाचे लक्ष लागून राहिलेले ISRO चे Aditya L1 हे यान अवकाशात झेपावले आहे. PSLV-C57 ने अवकाशात झेप घेतली असून त्याची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे.

https://twitter.com/ANI/status/1697857372495233078

11:47 (IST) 2 Sep 2023
Aditya L1 च्या प्रक्षेपणासाठी ग्रीन सिग्नल...

कुठल्याही प्रक्षेपणाआधी शेवटच्या क्षणी प्रक्षेपकाशी संबंधित सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याची खात्री केली जाते. वातावरणाचा अंदाज घेतला जातो. त्यानंतर प्रक्षेपणासाठी ग्रीन सिग्नल दिला जातो. कालच म्हणजे शुक्रवारी जरी उलट गिणती Aditya L1 च्या प्रक्षेपणासाठी सुरु झाली असली तरी श्रीहरीकोटा इथल्या नियंत्रण कक्षातून आज शेवटचा आढावा घेतला गेला आहे आणि प्रक्षेपण नियोजित वेळेनुसार म्हणजे ११ वाजून ५० मिनिटांनी होणार असल्याचं जाहिर करण्यात आलं.

11:44 (IST) 2 Sep 2023
इस्रोचे प्रक्षेपण बघण्यासाठी श्रीहरीकोटा इथली प्रेक्षक गॅलरी खचाखच

Aditya L1 चे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा इथल्या प्रेक्षक गॅलरीत लोकांनी गर्दी केली आहे. गेली काही वर्षे उपग्रहांचे - यानांचे थेट प्रक्षेपण प्रत्यक्ष बघता यावे यासाठी एक मोठी गॅलरी बांधण्यात आली आहे. प्रक्षेपण स्थळापासून सुरक्षित अंतरावर असलेल्या या गॅलरीतून एका वेळी ५०० पेक्षा जास्त प्रेक्षक प्रक्षेपण बघू शकतात.

https://twitter.com/ANI/status/1697850932216926432?s=20

11:29 (IST) 2 Sep 2023
थेट श्रीहरीकोटा इथल्या नियंत्रण कक्षातली दृश्ये...

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO चे Aditya L1 हे यान प्रक्षेपणासाठी सज्ज झालं आहे. PSLV-C57 या प्रक्षेपकात इंधन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता काही मिनिटातच ते अवकाशात झेप घेणार आहे. नियत्रंण कक्षात प्रक्षेपणासाठी आवश्यक प्रत्येक सिस्टीमचा अपडेट घेण्याचे काम नियंत्रण कक्षातून सुरु आहे.

https://twitter.com/ANI/status/1697852697691734165?s=20

11:22 (IST) 2 Sep 2023
सूर्यनमस्कार घालत ISRO च्या Aditya L1 मोहिमेला शुभेच्छा

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO हे Aditya L1 या यानाचे प्रक्षेपण काही वेळेतच करणार आहे. तेव्हा या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर डेहराडून येथील प्रसिद्ध दून योगपिठामध्ये सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम राबवत जरा हटके, वेगळ्या प्रकारे इस्रोच्या माहिमेला शुभेच्छा देण्यात आल्या. ( photo Courtsy - ANI )

11:06 (IST) 2 Sep 2023
सूर्याच्या केंद्रबिंदूचे तापमान १.५० कोटी सेल्सिअस

सूर्याच्या बाह्य भाग फोटोस्फिअर येथील तापमान ५५०० अंश सेल्सिअस असतं. तर, सूर्याच्या केंद्रबिंदूचे तापमान १.५० कोटी अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे कोणतंही यान सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही.

10:52 (IST) 2 Sep 2023
'आदित्य एल१' मोहिमेसाठी 'इतक्या' कोटींचा खर्च

'इस्रो'ने 'आदित्य एल१' यानाच्या मोहिमेला २०१९ साली सुरूवात केली होती. यामोहिमेसाठी तब्बल ४०० कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.

10:49 (IST) 2 Sep 2023
चंद्रानंतर आता ‘इस्रो’चा ‘सूर्य नमस्कार’, ‘आदित्य एल१’चं प्रक्षेपण; १५ लाख किलोमीटरचा करणार प्रवास

चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्था ( इस्रो ) आता सूर्याकडे झेप घेत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी 'आदित्य एल१' अंतरयान श्रीहरिकोटा येथून आज ( २ सप्टेंबर ) ११ वाजता प्रक्षेपित होत आहे. लाँचिंगच्या १२७ दिवसांनी यान एल-१ अचूक कक्षेपर्यंत पोहचेल. यानंतर सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असं 'इस्रो'नं सांगितलं आहे.

वाचा सविस्तर...

Aditya-L1 Mission Information Photos

’सात पेलोड्सपैकी चार स्पेसक्राफ्ट सूर्याचे थेट निरीक्षण करतील, तर उर्वरित तीन पेलोड्स ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) बिंदू येथील कणांचा, तेथील क्षेत्राचा अभ्यास करतील.

Story img Loader