ISRO Aditya L1 Mission: भारताची पहिली वहिली सौर मोहीम आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि Ions आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करतो, असे इस्रोने सोमवारी सांगितले आहे. १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पट पेक्षा जास्त आहे.

इस्रोच्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून ५०,००० किमी पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सामान्य पॅरामीटर्समध्ये कार्यरत आहे असेही इस्रोने सांगितले आहे.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
ISRO docked SpaDeX satellites space
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान

STEPS म्हणजे काय?

स्टेप्स हे सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, जे आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोडचा एक भाग आहे. स्टेप्स मध्ये सहा सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो आणि सुप्रा-थर्मल आणि आयन मोजतो. कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून हे मोजमाप केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा शास्त्रज्ञांना मदत करणार आहे.”

हे ही वाचा<< ISRO Aditya L1: आदित्य एल १ ने पाठवला पहिला वहिला सेल्फी; सूर्याकडे जाण्याच्या प्रवासातील खास Video पाहा

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) द्वारे इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) च्या समर्थनासह स्टेप्स विकसित करण्यात आले आहे. अंतराळयान त्याच्या कक्षेत निश्चित ठिकाणी स्थिरावल्यावर स्टेप्सचे सेन्सर चालू असतील. L1 च्या आसपास गोळा केलेला डेटा अवकाशातील हवामानाविषयी, सौर वारा आणि अॅनिसोट्रॉपी (दिशांनुसार बदलणारे वस्तुमान) याबद्दल माहिती देईल.

Story img Loader