Aditya L1 Solar Mission Live Streaming: चांद्रयान-3 च्या मोठ्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आता थेट सूर्याच्या अभ्यासासाठी एका मोठ्या अंतराळ मोहिमेची तयारी करत आहे. ISRO ने आदित्य-L1 सौर मोहिम लाँच करण्यासाठी शनिवारी (२ सप्टेंबर) ची तारीख निवडली आहे. आदित्य-L1 ही सूर्याच्या निरीक्षणासाठी इस्रोची पहिली समर्पित भारतीय अंतराळ मोहीम असेल.
Aditya-L1 मिशनची लाँचची तारीख व वेळ (Date & Time)
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावणार आहे. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता हे अवकाश यान लाँच केलं जाईल. या संपूर्ण उपक्रमाचे बजेट ४०० कोटींपर्यंत असणार आहे.
Aditya-L1 मिशनचे लाइव्ह स्ट्रीमिंग (Aditya L1 Solar Mission Live Streaming)
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या मोहिमेची प्रक्षेपणाची तालीम व अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे. रॉकेट व सॅटेलाईट राऊत आहे. आम्ही तयार आहोत आणि आता फक्त उद्याच्या क्षणासाठी वाट पाहत आहोत. आदित्य एल1 सोलर मिशन इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल.
आदित्य-L1 अंतराळयान कसे आहे?
इस्रोच्या माहितीनुसार, आदित्य-L1 अंतराळयान फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या बाह्यतम स्तरांचे (कोरोनाचे) निरीक्षण करणार आहे. यासाठी आदित्य L1 अंतराळयानामध्ये सात पेलोड आहेत. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या L1 (सन-अर्थ लॅग्रॅन्जियन पॉइंट) येथे भ्रमण करून त्या स्थितीचे निरीक्षण करेल. विशेष व्हॅंटेज पॉइंट L1 वापरून, चार पेलोड्स थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन पेलोड्स लॅग्रेंज पॉइंट L1 येथे कण आणि फील्डचा इन-सीटू अभ्यास करतील.