भारतीय वायू दलातील अधिकारी Group captain सुधांशू शुक्ला यांची अवकाश मोहीमेसाठी निवड करण्यात आली आहे. NASA आणि ISRO यांनी गेल्या वर्षी एक संयुक्त करार केला होता. ज्या अतंर्गत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसह आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात ( international space station ) अंतराळवीर पाठवण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळेच एका भारतीयाला अवकाश प्रवास करणे शक्य होणार आहे.

सुधांशू शुक्ला यांच्यासह राखीव अंतराळवीर म्हणून भारतीय वायू दलातील आणखी एक अधिकारी Group captain प्रशांत बाळकृष्ण नायर यांची निवड करण्यात आली आहे. Axiom ही अवकाश प्रवासासाठी स्थापन करण्यात आलेली अमेरिकेतील एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीचा NASA शी अवकाश स्थानकासाठी करार आहे. या कंपनीमार्फत अवकाश स्थानकासाठी मोहीमा आखल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता भारतीय अंतराळवीर अवकाश प्रवास करत या अवकाशात स्थानकात जाणार आहे.

Miss Universe 2024 Denmark Victoria Kjaer was crowned the winner India rhea singha out from top 12
Miss Universe 2024 : डेनमार्कची विक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, तर भारताची १८ वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!

हे ही वाचा… Apple: पासवर्ड विसरलात अन् फोन झाला लॉक? चिंता सोडा! आता हृदयाच्या ठोक्यांसह करता येईल फोन अनलॉक?

विशेष म्हणजे सुधांशू शुक्ला, प्रशांत नायर हे भारताच्या महत्त्वकांक्षी Gaganyaan Mission च्या चार सदस्यांपैकी एक आहेत. गगनयान मोहीमेद्वारे भारताची अवकाश संस्था इस्रो (ISRO) स्बबळावर अवकाशात भारतीय अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहे. याआधीच या चार जणांचे अवकाश प्रवासासाठी आवश्यक लागणारे प्रशिक्षण सुरुही झाले आहे.

Axiom-4 मोहीम नक्की कधी आहे?

Axiom-4 ही मोहीम येत्या ऑक्टोबरमध्ये नियोजीत आहे. या मोहीमेत एकुण चार जण हे अवकाश प्रवास करत अवकाश स्थानकात जाणार आहेत. ही मोहीम एकुण १४ दिवसांची असेल. यात भारतीय अंतराळवीरासह अमेरिका, पोलंड आणि हंगेरी या देशांचे अंतराळवीर असतील. प्रसिद्ध Space X कंपनीचे रॉकेट आणि त्याच कंपनीची Crew Dragon हे अवकाश यान याद्वारे हा सर्व प्रवास होणार आहे.

भारताला फायदा काय?

गगनयान मोहीम ही आता पुढील वर्षी नियोजीत आहे, ज्यामध्ये चार भारतीय अंतराळवीर तीन दिवस अवकाश प्रवास करणार आहेत, पृथ्वीभोवती अवकाशात यानातून प्रदक्षिणा घालणार आहेत. तेव्हा या पहिल्या मोहीमासाठी लागणारा आवश्यक अनुभव हा Axiom-4 मोहीमेद्वारे सुधांशू शुक्ला यांना मिळणार आहे. यामुळे गगनयान मोहीम अधिक अचूक होण्यास मदतच होणार आहे.

राकेश शर्मा नंतर सुधांशू शुक्ला

भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून राकेश शर्मा यांची ओळख आहे. शर्मा यांनी १९८४ या वर्षी तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या Salyut 7 या अवकाशात स्थानकात काही दिवस वास्तव्य केलं होतं. या अवकाश स्थानकातून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवादही साधला होता.

हे ही वाचा… Elon Musk Claims Google: डोनाल्ड ट्रम्प नाव सर्च करण्यावर लावली बंदी? एलॉन मस्कचा दावा कितीपत खरा? गूगलकडून ऐका खरं उत्तर

तेव्हा सुधांशू शुक्ला हे आता अवकाशात प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत. तर सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, राजा चारी अशा भारतीय वंशाच्या पण परदेशात स्थायिक असलेल्या नागरीकांनी याआधीच अवकाश प्रवास केलेला आहे.