भारताच्या चांद्रमोहिमेला सोमवारी (४ सप्टेंबर) छोटासा ब्रेक लागला. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात उतरवलेलं चाद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करत होतं. परंतु, चंद्रावर आता रात्र असल्याने म्हणजेच अंधार पडल्यामुळे इस्रोच्या संशोधनकार्याला छोटासा ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, जसे की तिथलं तापमान, तिथल्या मातीत असणारे घटक, तिथले फोटो आणि व्हिडीओ मिळत होते. परंतु, चंद्रावर अंधार पडल्यामुळे या संशोधनकार्याला ब्रेक लागला आहे.

चंद्रावर १४ दिवस रात्र (गडद अंधार) आणि १४ दिवस उजेड असतो. आता चंद्रावर अंधार पडला आहे. त्यामुळे इस्रोचं अवकाशयान सोमवारी निष्क्रिय करण्यात आलं. इस्रोने रविवारी रात्री प्रज्ञान रोव्हरला झोपवलं (स्लीप मोड अ‍ॅक्टिव्हेट केला). त्यापाठोपाठ सोमवारी सकाळी ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) विक्रम लँडर निद्रावस्थेत गेला. लँडर, रोव्हरसह चांद्रयान-३ मधील सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवर चालतात. त्यामुळे हे अवकाशयान काही दिवसांसाठी निष्क्रिय करण्यात आलं आहे.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

निद्रावस्थेत जाण्यापूर्वी प्रज्ञान आणि विक्रमने पाठवलेल्या माहितीवर इस्रोकडून संशोधन सुरू आहे. दरम्यान, प्रज्ञानने इस्रोला पाठवलेला एक फोटो नुकताच इस्रोने शेअर केला आहे. इस्रोने चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचा एक थ्रीडी (3D) फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. खरंतर थ्रीडी चष्म्यातून हा फोटो पाहण्याची खरी मजा आहे. तुमच्याकडे जर रेड आणि सयान थ्रीडी (लाल आणि निळसर) चष्मा असेल तर तो घालून तुम्ही हा फोटो पाहा. तुम्हाला हा फोटो चंद्राची सफर घडवेल. विक्रम लँडरचा हा फोटो प्रज्ञान रोव्हरने टिपला आहे. लँडरपासून १५ मीटर दूर म्हणजेच ४० फुटांवरून हा फोटो टिपला आहे.

हे ही वाचा >> “आम्ही आंदोलन मागे घेत नाही, या सरकारला…”, गिरीश महाजनांशी केलेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य

प्रज्ञान रोव्हरच्या नेव्हकॅमने (NavCam) हा फोटो टिपला आहे. जो नंतर नेव्हकॅम स्टीरियोमध्ये रुपांतरित करण्यात आला आहे. हा थ्री चॅनेलवाला फोटो खरंतर दोन फोटोंचं संयोजन करून बनवला आहे. यातला एक फोटो रेड चॅनेलवर होता तर दुसरा फोटो ब्लू आणि ग्रीन चॅनेलवर. इस्रोच्या बंगळुरूतील कार्यालताील डिझाईनरने हा फोटो तयार केला आहे. जेणेकरून आपल्याला चंद्राचा थ्रीडी व्ह्यू पाहता येईल. तुम्ही थ्रीडी चष्म्यातून हा फोटो पाहिला तर तुम्हला चंद्रावर उभे राहून विक्रम लँडरकडे पाहत असल्याचा भास होऊ शकतो.

Story img Loader