स्बबळावर अवकाशात भारतीय अंतराळवीरांना नेण्याच्या इस्रोच्या गगनयान मोहीमेने आज एक पाऊल पुढे टाकले आहे. अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अंतराळात जाणार आहेत त्या यानाच्या आपातकालीन सुटकेची चाचणी (crew escape system) आज इस्रोने यशस्वी केली. यामुळे भविष्यात प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवतांना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटात तांत्रित बिघाड झाला तर प्रक्षेपकावर-रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाशान यानातील अंतराळवीरांना पुन्हा सुखरुप जमिनीवर आणणे हे शक्य होणार आहे. याबाबची पहिली चाचणी त्या अवकाश यानाच्या माध्यमातून आज करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी आठ वाजता नियोजित ही चाचणी होणार होती. मात्र हवामानामुळे चाचणी पुढे ढकलली होती, त्यानंतर संगणकाने इशारा दिल्यावर ही चाचणीसाठी असलेले काऊंट डाऊन थांबवण्यात आले. मात्र नेमकं कारण लक्षात आल्यावर पुन्हा काऊंट डाऊन सुरु करत ही चाचणी करण्यात आली असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.

अपेक्षेप्रमाणे चाचणीसाठी नियोजित केलेले आपातकालीन सुटकेचे सर्व टप्पे हे पुर्ण झाल्याचं यावेळी जाहिर करण्यात आलं आहे. आता गगनयानची आणखी एक चाचणी पुढील काही महिन्यात केली जाणार आहे.

यानाच्या आप्तकालीन सुटकेची चाचणी का महत्त्वाची?

अवकाश यान हे रॉकेटच्या अग्रभागावर – टोकावर असते. जर उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाण झाल्यावर रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर रॉकेटचा लगेचच स्फोट होण्याची शक्यता असते. कारण रॉकेटमध्ये कित्येक हजार टन असं अत्यंत ज्वलनशील इंधन असते. अशा वेळी अकाशयानातील अंतराळवीरांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा हे अवकाश यान लगेचच मुख्य रॉकेटपासून वेगळं होत दूर जात सुखरूप पृथ्वीवर परतणार असं नियोजन असते.

सुरुवातीच्या तांत्रिक बिघाडानंतर आपातकालीन सुटकेचे चाचणी यशस्वी झाल्याने आता गगनयान मोहिमेचा पुढचा टप्पा आणखी लवकर पार पडेल अशी आशा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro test isros biggest success crew escape system tv d1 tested successfully asj
Show comments