भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र जलद गतीने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. इंटर्नल कंबशन इंजिन (ICE) वर चालणाऱ्या वाहनांवरही सरकार कडक कारवाई करत आहे. तसेच वायू प्रदूषण, इंधनांच्या वाढत्या किंमती हे देखील महत्त्वाचे मुद्दे असल्याने इलेक्ट्रिक वाहने अधिक लोकप्रिय होऊ लागले आहेत. पण जर तुम्ही एका नव्या इलेक्ट्रिक वाहनासाठी मोठी रक्कम देऊ इच्छित नसाल तर अशा परिस्थितीत आपल्याकडे इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सेकंड हॅन्ड इलेक्ट्रिक कार खरेदी करावी का?

जुन्या कार्सच्या बाजारात क्वचितच आपल्याला कोणती जुनी इलेक्ट्रिक कार सापडेल. याशिवाय सध्याच्या गाड्यांचा विचार करता जुन्या इलेक्ट्रिक कारमध्ये ती गोष्ट नसेल. आता दुसरा पर्याय असा की आपल्या पारंपरिक पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कारलाच इलेक्ट्रिक वाहनात बदलणे.

सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य ?

काही वर्षांपूर्वी ही गोष्ट हास्यास्पद वाटायची पण आता तसे नाही. छोट्या ऑटोमोबाईल कंपन्या आयसीईवर चालणाऱ्या तसेच गॅसवर चालणाऱ्या वाहनांना निरुपद्रवी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन किट विकसित करण्याची क्षमता तपासत आहेत. भारतामध्ये अद्याप इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार तयार झालेला नाही, पण काही स्वस्त पर्याय शोधत असलेल्या खरेदीदारांसाठी ‘रूपांतरण’ हा सुद्धा एक सामान्य पर्याय बनू शकतो. तेही जेनेरिक वाहनांची व्यावहारिकता न गमावता.

ओला अ‍ॅप अंतिम पेमेंटसाठी कधी खुले होणार आणि कधी मिळणार ओला इलेक्ट्रिक स्कुटर? जाणून घ्या तारीख

इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण (Electric Vehicle Conversion) म्हणजे काय ?

यात फक्त वाहनातून जीवाश्म-इंधन इंजिन काढून टाकून त्याजागी इलेक्ट्रिक पावरट्रेन जोडले जाते. बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर एखाद्या वाहनाला रिफीट केले जाऊ शकते जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाकडून अपेक्षित असलेले सर्व फायदे मिळू शकतील. हे वाहन अगदी एखाद्या इलेक्ट्रिक वाहनासारखे नसले तरीही तुम्ही या वाहनाच्या माध्यमातून कोणत्याही अडथळ्याविना प्रवास करू शकता.

सामान्य वाहनाला इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करायला किती खर्च अपेक्षित आहे ?

आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण कंपन्या केवळ विशिष्ट कार मॉडेल्ससाठी विशिष्ट किट तयार करतात. तसेच प्रत्येक कार ही इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित होऊ शकत नाही. रूपांतरण मॉडेल विशिष्ट असते आणि विकासकांना त्यांचे किट व्यवसायिकरित्या विकले जाण्यापूर्वी सरकारकडून मंजुरी मिळवणे आवश्यक असते.

फक्त १९ हजार देऊन घरी घेऊन जा Yamaha R15 V4 स्पोर्ट्स बाईक; स्टाईलसोबतच मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स

किमतीचा अंदाज घेण्यासाठी, टेक वेबसाइट https://www.bgr.in ने नॉर्थवे मोटरस्पोर्ट या पुण्यातील ईव्ही किट उत्पादक कंपनीशी संवाद साधला. नॉर्थवे मोटरस्पोर्टच्या सौरभ जोशी यांनी सांगितले की त्यांना देखील मारुती सुझुकी डिझायर आणि मारुती सुझुकी इग्निस या कारसाठी बनवण्यात आलेल्या २ किट्सच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. दोन महिन्यात मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

पूर्व-मालकीची सुझुकी डिझायर असलेली व्यक्ती जर आपल्या कारला इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करण्यासाठी नॉर्थवेला गेला तर त्याला सुमारे ६.५ लाख रुपये खर्च करावे लागतील. यशस्वी रूपांतरणानंतर ही कार जवळपास १२० किमीची रेंज प्रदान करेल. भविष्यात २५० किमीची रेंज प्रदान करण्यास सक्षम असणारे दीर्घ श्रेणीचे किट तयार करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या ही कंपनी एकल मोटर पॉवरट्रेन विकण्याची योजना आखत आहे. याला ७.५ केडब्ल्यूसाठी रेट करण्यात आले असून याचा पीक पॉवर २५केडब्ल्यूपर्यंत जातो.