हा चॅटबॉट लोकांची वैयक्तिक माहिती आणि गोपनीयतेशी खेळत आहे असल्याचे कारण देत इटालियन डेटा संरक्षण प्राधिकरणाने (Italian Data Protection Authority ) गेल्या आठवड्यामध्ये ChatGpt वर बंदी घातली आहे. या आधी फ्रान्स युनिव्हर्सिटीनेदेखील या चॅटबॉटवर बंदी घातली आहे. संपूर्ण जगभरामध्ये OpenAI ने लॉन्च केलेला Chatgpt खूप लोकप्रिय होत आहे. हा एक कृत्रिम chatbot आहे. तसेच तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारला की हा चॅटबॉट त्याच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्हाला उत्तरे देतो.
AI मॉडेलपासून गोपनीयतेसंबंधित चिंता वाटत होती असे इटलीचे डेटा संरक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इटालियन प्रायव्हसी वॉचडॉगने सांगितले की, त्यांनी ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI वर तातडीने पण तात्पुरते निर्बंध लादले आहेत कारण इटालियन वापरकर्त्यांच्या डेटावर प्रक्रिया करण्यापासून रोखता यावे. याशिवाय इटलीची प्रायव्हसी वॉचडॉग चॅटबॉटने युरोपियन संघाचे जनरल डेटा प्रोटेक्शन (जीडीपीआर) चे उल्लंघन केले आहे की नाही याची चौकशी करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Twitter Logo : एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय, ट्विटरचा लोगो बदलला, नवा लोगो कोणता? पाहा…
या कारणामुळे केले बॅन
ChatGpt वर इटली सरकारने बंदी घातली आहे. हा चॅटबॉट लोकांची खाजगी माहिती गोळा करत असल्याचे इटली सरकारचे म्हणणे आहे. जे योग्य नाही आहे. तसेच AI टूलमध्ये किमान वय पडताळणीसाठी कोणताही पर्याय नाही आहे. अशा परिस्थितीत, ते अल्पवयीन मुलांना संवेदनशील माहिती देऊ शकते. ज्यामुळे त्यांच्या विकासावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. इटलीच्या डेटा संरक्षण अधिकार्यांचे म्हणणे आहे की हा चॅटबॉट आधी लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करतो आणि त्यानंतर त्याला प्रशिक्षण दिले जाते.ही नागरिकांच्या गोपनियतेशी खेळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
OpenAI ने दिले उत्तर
ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI या कंपनीनेही इटालियन डेटा प्रोटेक्शन अधिकाऱ्यांच्या आरोपांवर एक स्टेटमेंट दिले आहे. OpenAI ने सांगितले की ते गोपनीयता कायद्यांचे पालन करते. OpenAI ने सांगितले की त्यांनी इटालियन डेटा संरक्षण नियामकाच्या सूचनेनुसार ChatGPT इटलीमधील वापरकर्त्यांसाठी बंद केले आहे. पण आम्ही लवकरच परत येऊ. असे कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
फ्रान्समधील युनिव्हर्सिटींपैकी एक Science Po या युनिव्हर्सिटीने ChatGPT च्या वापरावर बंदी घातली आहे. या युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार याच्या मदतीने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात आणि मूळ डेटा चोरीला जाऊ शकतो. ChatGPT वापर करणाऱ्यांना युनिव्हर्सिटीमधून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यांच्या उच्च शिक्षणावरही बंदी घातली जाऊ शकते, असे युनिव्हर्सिटीकडून सांगण्यात आले आहे.
ChatGPT हे सुरुवातीपासून डेटा चोरीच्या बाबतीत संशयित आहे आणि तो चिंतेचा विषय आहे. हे माध्यम कोणत्याही विषयावर कमी कालावधीमध्ये माहिती देण्यास सक्षम आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वात जास्त चॅटजीपीटीचा करताना दिसत आहेत. याच्या मदतीने अभ्यास आणि नोट्स तयार करत आहे.