येणारे नवीन वर्ष अनेक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे असे दिसते. सध्या चायनाचा Itel A70 हा स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती मिळते. जर हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला, तर हा इतर फोन्सपेक्षा वेगळा ठरणार आहे. काय आहे या Itel A70 स्मार्टफोनची खासियत पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Itel A70 स्मार्टफोन

Itel A70 या स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध असून, याची किंमत मात्र चक्क ८००० रुपयांच्या आतमध्ये असणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते. भविष्यात याचे कॉन्फिगरेशन १२८ जीबी रॅमसह जोडले जाणार असून, त्यानंतर Itel A70 हा २५६ जीबी स्टोरेज असूनदेखील जवळपास आठ हजार रुपायांमध्ये मिळणारा भारतातील सर्वात पहिला स्मार्टफोन असेल, असेही समजते.

या फोनला ४जी व्हर्चुअल सपोर्ट मिळणार असून, याचे डिझाइन अतिशय नाजूक [sleek] असणार आहे. या फोनला उत्तम पकड मिळावी यासाठी फोनची चौकोनी अशी फ्रेम असणार असून या फोनचे कोपरे थोडे गोलाकार असतील. या फोनमध्ये वाइड नॉच सेन्सर फ्रंट कॅमेरा आणि फोनच्या डावीकडे सिमकार्ड ट्रे असणार आहे. यासोबतच निळा, हिरवा, आकाशी पिवळा इत्यादी रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : विमानाचे तिकीट बुक करणे पडले महागात; बसला ४.४ लाखांचा फटका! नेमके प्रकरण जाणून घ्या….

Itel A70 भारतात कधी होणार लॉन्च?

Itel A70 हा फोन भारतामध्ये जानेवारी महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.

जे वापरकर्ते Itel A या सीरिजच्या डिजिटल अपग्रेडबद्दल बोलत आहेत, त्यांना उद्देशून कंपनीने आपल्या देशाच्या आजूबाजूंच्या प्रदेशांमध्ये नऊ कोटी ग्राहक असल्याचा दावा करत, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी A05s, P55 आणि S23 हे स्मार्टफोन लॉन्च केले असून त्यांच्या किंमती अनुक्रमे ६,९९९ रुपये, ८,९९९ रुपये आणि १२,९९९ रुपये असल्याची माहिती मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itel a70tel smartphone is expected to launch in india soon what are the features and price check out dha
First published on: 31-12-2023 at 15:57 IST