Itel launches Magic X Pro 4G Phone: Itel ने आपला नवीन फीचर फोन भारतात लाँच केला आहे. itel Magic X Pro हा कंपनीचा नवीन फीचर फोन आहे आणि तो हाय-स्पीड हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटीसह येतो. itel नुसार, हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटीद्वारे या फीचर फोनशी ८ पर्यंत डिव्हाइस कनेक्ट केले जाऊ शकतात। याआधी मॅजिक X सीरीजमध्‍ये Itel Magic X आणि Itel Magic X Play 4G VoLTE फीचर फोन देखील भारतात लाँच केले गेले आहेत. तर जाणून घ्या नवीन मॅजिक एक्स प्रो फोनच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

itel Magic X Pro वैशिष्ट्ये

Itel Magic X Pro 4G VoLTE टेक्नॉलॉजी मिळते. या फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. फोनचे डिझाईन उत्तम असून ते आकाराने लहान आहे. फोनमध्ये ८ गेम प्री-इंस्टॉल केलेले आहेत. या Itel फोनमध्ये VGA रियर कॅमेरा आहे आणि ड्युअल सिम कार्डला सपोर्ट करतो.

या फोनद्वारे हॉटस्पॉटशी ८ पर्यंत डिव्हाइस कनेक्ट केले जाऊ शकतात. Itel Magic X Pro बॉक्समध्ये चार्जर आणि वायरलेस हेडसेटसह येतो. डिव्हाइस HD-सक्षम VoLTE कॉल आणि LetsChat चॅट गटांसह देखील येते. फोनला पॉवर करण्यासाठी २५००mAh बॅटरी देण्यात आली आहे. मॅजिक एक्स प्रो बू प्ले हे या हँडसेटमध्ये दिलेले आणखी एक उपयुक्त नवीन वैशिष्ट्य आहे.

( हे ही वाचा: एका चार्जवर ७ दिवस चालणार, ब्लूटूथ कॉलिंगसह लाँच झाली COLORFIT LOOP SMARTWATCH, किंमत केवळ..)

मॅजिक एक्स प्रो सह, वापरकर्ते ऑनलाइन संगीत ऐकू शकतात. या फीचर फोनमध्ये एफएम रेडिओ उपलब्ध आहे. याशिवाय हँडसेटमध्ये गाणी प्री-लोड केलेली असतात. वापरकर्ते अंगभूत BoomPlay द्वारे ७४ मिलियन गाणी स्ट्रीम करू शकतात.itel Magic X Pro 4G फोन १२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली, उडिया, आसामी आणि उर्दू यांचा समावेश आहे.

itel Magic X Pro 4G किंमत

Itel Magic X Pro 4G फोनची किंमत २९९९ रुपये आहे. हा फोन २ वर्षांच्या सर्व्हिस वॉरंटीसह येतो. हँडसेट ब्लॅक आणि ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोन ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itel magic x pro 4g volte feature phone hotspot connectivity launched for rupees 2999 gps
Show comments