मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेलता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरला टक्कर देण्यासाठी Blue sky नावाचे अ‍ॅप लॉन्च केले आहे. जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. जॅक डोर्सी यानींच ट्विटरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये एका उंचीवर नेले होते. आता ब्ल्यू स्काय लॉन्च करून ते ट्विटरला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्ल्यू स्काय हे अ‍ॅप सध्या अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. त्याची सध्या टेस्टिंग सुरु आहे. माहितीनुसार कंपनी हे अ‍ॅप लोकांसाठी लवकरच लॉन्च करणार आहे. ज्या पद्धतीने लोकं ट्विटरवर ट्विट करू शकतात , लोकांना फॉलो करू शकतात त्याच पद्धतीने लोकं या अ‍ॅपचा वापर करू शकणार आहेत.

हेही वाचा : Twitter Down: ट्विटरची सेवा जगभरात पुन्हा ठप्प; वापरकर्ते एलॉन मस्कवर भडकले, सुरु केला ‘हा’ ट्रेंड

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्यासाठी पेड सर्व्हिस सुरु केली. आता वापरकर्त्यांना ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागत आहेत. ट्विटर फक्त ब्ल्यू टिक साठीच नव्हे तर अनेक सर्व्हिससाठी शुल्क आकारते. जॅक डोर्सी यांनी लॉन्च केलेले ब्ल्यू स्काय हे अ‍ॅप वापरकर्त्यांना मोफत वापरता येणार आहे. यामुळे ते लवकरच ट्विटरपेक्षा जास्त प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.