हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला की, आपल्याला अंगावरच्या कपड्यांची संख्याही वाढवावी लागते. म्हणजेच शर्टवर स्वेटर चढवले जाते तर उन्हाळ्यात ऊन वाढले की, मग आपण तलम सुती कापडावर येतो. पण समजा बाहेरचे तापमान किती आहे हे पाहून आपल्या कपड्यांनीच त्यांच्या आतमधले आपल्या शरीरालगतचे तापमान स्वतःहून कमी- अधिक केले तर? म्हणजेत हिवाळ्यात कपड्यांनी ऊब तर उन्हाळ्यात शरीराला गारवा दिला तर ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : सावधान: यु-टयूब पाहून ‘अशाप्रकारचे’ फटाके बनवाल तर पडेल महागात!

आजपर्यंत अशक्य वाटणारी ही बाब आता जपानमधील शिन्शू विद्यापीठातील संशोधकांनी प्रत्यक्षात आणली आहे. यावर काम करणारे सर्व संशोधक हे वस्रोद्योग उद्योगाशी संबंधित इंजिनीअर्स आहेत. आतमध्ये उष्णता पकडून ठेवण्याची किंवा ती बाहेर टाकण्याची क्षमता असलेल्या फेज- चेंज मटेरिअलचा (पीसीएम) वापर करून तयार केलेल्या सुपरफाईन नॅनो धाग्यांच्या माध्यमातून हे कापड विणण्यात आले आहे.

आणखी वाचा : Flipkart Bumper Diwali Offer: सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळतेय भरघोस सूट; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!

या कापडासंदर्भात अधिक माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला इ-मेलच्या माध्यमातून देताना यावर संशोधन करणारे हिदेकाई मोरिकावा सांगतात, ‘स्वतःची खास तापमान नियंत्रण यंत्रणा म्हणूनही या कापडाचा वापर करता येईल. ज्या वस्तूंसाठी तापमान नियंत्रण करावे लागते अशा सर्व प्रकारच्या वस्तूंच्या पॅकेजिंगसाठीही हे कापड वापरता येऊ शकते. उदाहरणच घ्यायचे तर इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा तसेच बॅटरीजच्या पॅकेजिंगसाठी याचा वापर उत्तमपणे केला जाऊ शकतो.’ या संशोधनासंदर्भातील माहिती एसीएस नॅनो या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्या शोधनिबंधाचे मोरिकावा हे सहलेखक आहेत.

आणखी वाचा : पीएफ खात्याचा पासवर्ड विसरलात? काळजी करू नका! पासवर्ड रिसेट करण्यासाठी जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स…

शीतगृह, बेकिंग या सारखे असे अनेक उद्योग आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून सतत वेगवेगळ्या तापमान बदलांमध्ये काम करावे लागते. अशा प्रकारे सतत वेगवेेगळ्या तापमान बदलांमध्ये काम करावे लागणे जिकिरीचे तर असतेच पण त्याचवेेळेस ते कामगारांना आजारी पाडणारेही असते. कारण सततच्या तापमान बदलांचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होत असतो. त्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी सातत्याने कपडे बदलणेही तेवढेच त्रासदायक असते. म्हणजेच शीतगृहात प्रवेश करताना स्वेटर घालायचे आणि बाहेर आले की काढायचे. हे त्रासदायक असते. अशा ठिकाणी या पीसीएम तंत्रज्ञानाचा वापर त्यांचा त्रास कमी करू शकतो. यामध्य़े उष्णता ग्रहण करून गरज भासताच ती बाहेर फेकण्याची क्षमता दडलेली आहे. पण या तंत्रज्ञानाच्या स्वतःच्या अशा काही गरजा आहेत. म्हणजेच या कापडाचा धागा असा असावा लागेल जो उष्णता बाहेर फेकण्यास सुरुवात होताच वितळणार नाही. अन्यथा टी- शर्ट वितळले तर… असे चालणार नाही. पीसीएमची एक मायक्रोकॅप्सुल तयार करून तिचा वापर करण्याचा प्रयत्नही संशोधकांनी केला. मात्र त्यास फार यश आले नाही.

आणखी वाचा : खुशखबर! इतक्या कमी दरात वनप्लसचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात लाँच; भन्नाट फीचर्ससह मिळणार बरचं काही…

मोरिकावा यांच्या मते प्रत्यक्ष हे कापड अंगावर परिधान करायचे असेल तर त्यात इतरही मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव करावा लागणार होता. म्हणूनच इलेक्ट्रोस्पिनिंगचा वापर करण्यात आला. नॅनोमीटर एवढ्या कमी जाडीचा धागा तयार करण्यासाठी ही पद्धतीप्रक्रिया वापरली जाते. पीसीएम कॅप्सुल असलेले नॅनोफायबर म्हणजेच अतिसूक्ष्म धागे तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मात्र याच बरोबर फोटोरिस्पॉन्सिव्ह आणि इलेक्ट्रोथर्मल अशा आणखी दोन तंत्रज्ञानांचा वापर त्यात करण्यात आला. यातील फोटोरिस्पॉन्सिव्ह तंत्रज्ञान उष्णता ग्रहण करते तर इलेक्ट्रोथर्मल तंत्रज्ञान त्या अतिरिक्त उष्णतेचे रूपांतरण वीजेमध्ये करते. या तिन्ही तंत्रज्ञानांच्या एकत्रित वापरामुळेच आता असा धागा आणि कापड करण्यात यश आले आहे, ज्याचा वापर अनेकविध गोष्टींसाठी करता येईल.

आणखी वाचा : आता इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये ॲड करता येणार गाणे! काय आहे नवे फीचर जाणून घ्या

मात्र मोरिकावांच्या मते, ‘याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात सध्या तरी अनेक अडचणी आहेत. संशोधकांनी शून्य ते ८० अंश सेल्सियस या वातावरणात हे कापड कसे काम करते, त्याच्या चाचण्या घेतल्या खऱ्या; पण हे कापड वर्षानुवर्षांच्या वापरानंतर कसे झिजणार त्याचा कोणताच अंदाज आलेला नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल. धागे वीरतात आणि त्यानंतर कापड फेकून द्यावे लागते. तसे या कापडाचे काय होणार याचा अंदाज संशोधकांना अद्याप आलेला नाही.’

आणखी वाचा : BSNL ने लाँच केले वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध होणारे दोन नवे रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या ऑफर

शिवाय ज्या कोअॅक्सिअल इलेक्ट्रोस्पिनिंगच्या माध्यमातून ते तयार केले जाते ती प्रक्रिया सध्या केवळ प्रयोगशाळांमध्येच शक्य आहे. शिवाय हा धागा तयार करण्यासाठी वापरलेले कंडक्टिव्ह पॉलीमर हे अतिशय महाग आहे. ते मोठ्या प्रमाणावर तयार करायचे तर त्यासाठी कमी किंमतीचे पॉलीमर तयार करावे लागतील. तरच त्याच्या शर्ट- पॅण्टस किंवा स्कर्ट्स- साड्या आदी तयार करता येतील!”

आणखी वाचा : खुशखबर: आता YouTube व्हिडीओ पाहताना झूम इन आणि आउट करता येणार

… पण हो, शोध तर नक्की लागलाय, फक्त आता हे सारे तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार ते आपल्याला ठावूक नाही!

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese engineers have developed fabric which can heat itself and cool too major breakthrough vp