मागील वर्षी ओपनएआयने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. या AI चा सध्या अनेक ठिकाणी वापर सुरु आहे. तसेच या चॅटबॉटशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या AI वर काम करत आहेत. OpenAI चे AI टूल ChatGPT इतके लोकप्रिय झाले आहे की निबंध लिहिल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर आणि तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर आता ChatGPT चा वापर जपानमध्ये सरकार चालवण्यासाठी देखील केला जाणार आहे.
CNN नेटवर्कच्या माहितीनुसार, जपानमधील कानागावा प्रीफेक्चरच्या योकोसुका शहराने घोषणा केली होती की सरकार प्रशासकीय काम करण्यासाठी AI टूल ChatGPT चा वापर करेल. जपानी सरकारच्या म्युनिसिपालिटी साइटवर जारी केलेल्या वृत्तात, असे नमूद केले आहे , सर्व कर्मचारी वाक्ये लहान करण्यासाठी, चुका तपासण्यासाठी आणि नवीन आयडीया शोधण्यासाठी ChatGPT चा वापर करतील. यामध्ये महत्वाची बाबा अशी आहे की , येथील प्रशासन याची एका महिन्यासाठी चाचणी सुरु करणार असून यासाठी ४,००० नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामांसाठी ChatGpt चा वापर करण्याची परवानगी देणार आहे.
हेही वाचा : Apple चे सीईओ टीम कुक यांनी AI बाबत केले भाष्य; म्हणाले, “आज अनेक…”
”या ठिकाणी लोकसंख्या घातल्याने कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. तथपि त्यांच्यासमोर अनेक प्रशासकीय आव्हाने उभी आहेत” असे योकोसुकाच्या डिजिटल व्यवस्थापन विभागाचे जनसंपर्क अधिकारी ताकायुकी समुकावा यांनी जपान टाइम्सशी बोलताना सांगितले. एकीकडे ChatGPT सरकारचे प्रशासकीय काम हाताळेल, तर दुसरीकडे कर्मचारी केवळ लोकच करू शकतील अशा कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. योकोसुका शहरातील लोकसंख्या ३ लाख ७६ हजार १७१ इतकी आहे.
चॅटजीपीटीला संधी देणारे योकोसुका हे पहिले शहर आहे. मात्र AI चॅटबॉटचे स्वागत करत नाही. या महिन्याच्या सुरुवातीला इटली सरकारने गोपनीयतेच्या कारणांमुळे ChatGPT वर तात्पुरती बंदी घातली आहे. सर्वत्र लोकप्रिय झालेल्या AI चॅटबॉट विरुद्ध अशी कारवाई करणारा इटली हा पहिला देश आहे.