Jio Best Recharge plan : आपण दिवसभरातील अनेक महत्त्वाची कामं मोबाईलवर करतो. त्यामुळे मोबाईलमध्ये रिचार्ज असणे आवश्यक असते. आता प्रत्येक टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर वाढवले आहेत. त्यामुळे आपण सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर्स असणाऱ्या रिचार्जच्या शोधात असतो. जर तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल तर ५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होणारा रिचार्ज प्लॅन तुम्ही निवडू शकता. यासारखे जिओचे आणखी काही स्वस्त रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, या रिचार्ज प्लॅनची किंमत काय आहे जाणून घ्या.

जिओचा २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • जिओच्या २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध होतो.
  • यासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • ऑफरमध्ये देण्यात आलेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ kbps होतो.
  • हा प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • या प्लॅनबरोबर जिओ सिनेमा, जिओ टीवी, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटी या ॲप्सचा फ्री एक्सेस मिळतो.

आणखी वाचा : ‘हा’ आहे बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ३० दिवसांसाठी कॉलिंग आणि डेटा होतो उपलब्ध

जिओचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • जर तुम्हाला २३ दिवसांऐवजी २८ दिवसांसाठी उपलब्ध होणारा प्लॅन हवा असेल तर तुम्ही २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता.
  • या रिचार्ज प्लॅनवर दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर मिळणाऱ्या ऑफर्स २४९ च्या रिचार्ज प्लॅनप्रमाणेच आहेत. फक्त हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो हा फरक आहे.
  • एअरटेल किंवा वोडाफोन या टेलिकॉम कंपण्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठीचा २ जीबी डेटा उपलब्ध होणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध नाही.

Story img Loader