रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करण्यासाठी लोकप्रिय आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिकडुन सतत नवनवे प्लॅन्स लाँच केले जातात. तर काही आधीच लाँच झालेल्या प्लॅन्सवर अधिक आकर्षित ऑफर्स देण्यात येतात. अशाच जिओच्या एका प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. काय आहे या प्लॅनची किंमत आणि ऑफर जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओचा आकर्षक रिचार्ज प्लॅन

  • जिओच्या या आकर्षक प्लॅनची पोस्टपेड आहे, याची किंमत ३९९ रुपये आहे.
  • या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी ७५ जीबी डेटा उपलब्ध होतो, यामध्ये दिवसानुसार डेटा उपलब्ध होत नाही, तुम्ही महिन्याभरात कधीही डेटा वापरू शकता.
  • यामध्ये डेटा रोलओवरची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
  • अनलिमिटेड कॉलिंगसह प्रत्येक दिवशी १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • या रिचार्ज प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅनबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते.
  • यासह जिओ ॲप्सचे देखील मोफत सब्सक्रिप्शन मिळते.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio 399 rupees postpaid recharge plan with free netflix amazon prime subscription pns