रिलायन्स जिओने देशात ६ वर्षे पूर्ण केली आहेत आणि ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने एक नवीन प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. या खास प्रसंगी, टेलिकॉम कंपनीने Jio 6th Anniversary Offer सादर केली आहे. या नवीन प्लॅनची किंमत २९९९ रुपये आहे आणि यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि 4G मोबाइल डेटासह एकूण ६ फायदे दिले जात आहेत.
Jio ने गेल्या महिन्यात २,९९९ रूपयांची इंडिपेंडन्स ऑफर देखील सादर केली होती. हे देशातील ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लिमिटेड कालावधीच्या ऑफर अंतर्गत लॉंच करण्यात आले होते. २,९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनीने Netmeds, AJIO, Ixigo सारख्या अनेक ब्रँड्सचे कूपन ऑफर केले होते आणि आता २,९९९ रुपयांच्या Jio 6th Anniversary Offer ऑफरसह कंपनीने अनेक फायदे आणले आहेत. विशेष म्हणजे ते वर्षभरासाठी वैध आहे. जाणून घ्या जिओच्या या नवीन ऑफरबद्दल…
आणखी वाचा : Apple iPhone 14 Pro: Apple iPhone 14 Pro फोनचा लाईव्ह व्हिडीओ लीक; ‘हा’ नवीन फीचर असेल…
Jio 6th Anniversary Offer Details
जिओच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आलेल्या प्रीपेड प्लॅनची किंमत २,९९९ रुपये आहे. हा मोबाईल रिचार्ज पॅक पूर्ण १ वर्षासाठी म्हणजे ३६५ दिवसांसाठी वैध आहे. या प्लॅनमध्ये दररोज २.५ GB 4G डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण ९१२.५ जीबी मोबाइल डेटा खर्च करू शकतात. दररोज उपलब्ध असलेला २.५ GB डेटा संपल्यानंतर, वेग कमी होऊन ६४ Kbps होतो.
याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर ग्राहकांना विनामूल्य Disney + Hotstar सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शनही मोफत आहे. याशिवाय पॅकमध्ये आणखी ६ फायदे उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमचे Whatsapp Chat वाचू शकणार नाही, ही ट्रिक वापरा!
या प्लॅनमध्ये, Jio आपल्या ग्राहकांना ७५ GB अतिरिक्त मोबाइल डेटा व्हाउचर ऑफर करते. यासोबतच Ajio, Netmeds, Ixigo, Reliance Digital आणि Jio Saavn Pro साठी कूपन देखील उपलब्ध आहेत. या सर्व कूपनचा लाभ घेण्यासाठी MyJio अॅपच्या ‘कूपन्स आणि विनिंग्स’ विभागात जा. लक्षात ठेवा की हे कूपन आणि व्हाउचर ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत.