Jio New Recharge Plan : देशात, आघाडीच्या तीन दूरसंचार कंपन्या आहेत, ज्यामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल वव्होडाफोन आयडिया यांचा समावेश आहे. त्यापैकी जिओ कंपनी सगळ्यांना परवडणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा पर्याय म्हणून पुढे आली आहे. म्हणून ४६ कोटींहून अधिक ग्राहक त्यांच्या सेवांचा आनंद घेत आहेत. तर, आता पुन्हा एकदा जिओ कंपनीने महागड्या प्लॅन्समधून दिलासा देण्यासाठी एक नवीन पर्याय सादर केला आहे.
रिलायन्स जिओ विविध युजर्सना त्यांना गरजांनुसार तयार केलेले विविध प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये ओटीटी प्लॅन, जिओ फोन प्लॅन, जिओ प्राइमा फोन प्लॅन, क्रिकेट ऑफर प्लॅन, डेटा पॅक व मनोरंजन पॅकेजेस यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या बजेट आणि गरजांनुसार रिचार्ज प्लॅन सहजपणे निवडू शकतात. तर आता कंपनीने अधिक वैधता देण्यासाठी हा प्लॅन लाँच केला आहे.
तर आम्ही ज्या जिओ रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत, तो ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्रीपेड पर्यायाची वैधता ९८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, सर्व नेटवर्कवर दररोज १०० मोफत एसएमएस, जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी दररोज २ जीबी डेटा, संपूर्ण कालावधीसाठी एकूण १९६ जीबी होईल. शिवाय, युजर्स या प्लॅनचा भाग म्हणून अमर्यादित ५ जी डेटाचा आनंद घेऊ शकतात.
९० दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन ( Jio 98 Days Recharge Plan With Subscription ) :
या ऑफरला आणखी खास करण्यासाठी, जिओ हॉटस्टारचे ९० दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शनसुद्धा दिले गेले आहे, ज्यामुळे त्यात तुम्हाला चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची मोफत परवानगी मिळेल, शिवाय, या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ टीव्हीचा मोफत प्रवेशसुद्धा समाविष्ट आहे.
दरम्यान, रिलायन्स जिओच्या १,०४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, तसेच ८४ दिवसांसाठी दररोज १०० एसएमएस कॉल आणि २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये ५० जीबी जिओएआय क्लाउड स्टोरेज आणि ९० दिवसांसाठी वैध असलेले जिओहॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते. युजर्सना जिओटीव्ही मोबाइल ॲपद्वारे झी ५ आणि सोनी लाईव्हदेखील उपलब्ध असेल. पण, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, एकदा युजर्सनी त्यांच्या फेअर युज पॉलिसी (FUP) डेटा लिमिट गाठली की, त्यांचा इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होईल.