Jio AI Cloud Welcome Offer : रिलायन्स जिओने युजर्ससाठी ‘जिओ एआय क्लाउड स्टोरेज वेलकम ऑफर’ (Jio Ai Cloud Storage Welcome offer) जाहीर केली आहे. युजर्सना यामध्ये १०० जीबीपर्यंत AI क्लाउड स्टोरेज आणि नवीन AI फीचर्समध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४७ व्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये अनेक उपक्रमांसह ही ‘जिओ एआय क्लाउड वेलकम ऑफर’ जाहीर केली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी ही घोषणा करण्यात आली आहे.
Jio ने JioCloud च्या ऑफरबद्दल काही निवडक युजर्सना SMS द्वारे हे सांगण्यास सुरुवात केली आहे. एसएमएममध्ये असे सांगण्यात आले आहे की, Jio कुटुंबातील एक खास सदस्य म्हणून JioCloud एक्सप्लोर करू शकेल (Jio Ai Cloud Storage Welcome offer) . ऑफरमध्ये एआय मेमरीज, एआय स्कॅनर व डिजीलॉकर यांसारख्या फीचर्ससह जिओक्लाऊडला १०० जीबी फ्री स्टोरेज मिळणार आहे.
त्यानंतर काही लोकांना असेही लक्षात आले की, क्लाउड स्टोरेजची लिमिट १०० जीबी पेल्सज जास्त आहे. म्हणजेच जिओ काही लोकांना १०० जीबी पेक्षा जास्त फ्री स्टोरेज देत आहे. याचबरोबर लोकांना काही नवीन एआय फीचर्स वापरण्याचीही संधी मिळणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा काही निवडक लोकांनाच उपलब्ध आहे.
१०० जीबीपर्यंत AI क्लाउड स्टोरेज (Jio AI Cloud Welcome Offer) :
ॲन्युअल जनरल मीटिंग (एजीएम)दरम्यान मुकेश अंबानी यांनी ‘क्लाउड स्टोरेज वेलकम ऑफरची’ घोषणा केली की, जिओ युजर्सना त्यांचे फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स, इतर डिजिटल कन्टेंट आणि डेटा सुरक्षितपणे सेव्ह व ॲक्सेस करण्यासाठी १०० जीबीपर्यंत मोफत AI क्लाउड स्टोरेज मिळेल (Jio Ai Cloud Storage Welcome offer). त्यांनी असेही नमूद केले की, ज्यांना अतिरिक्त स्टोरेजची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी जिओ बाजारात सर्वांत परवडणारे शुल्क आकारेल. अंबानी म्हणाले की जिओ एआय क्लाउड वेलकम ऑफर या वर्षीच्या दिवाळीपासून सुरू केली जाईल. या सेवेमुळे क्लाऊड स्टोरेजचा वापर सर्वांना सहज करता येणार आहे.
दरम्यान, रिलायन्स जिओ आणि वॉल्ट डिस्नेच्या डिस्ने स्टार यांच्यातील विलीनीकरणाला आता अंतिम रूप देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन मनोरंजन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संयुक्त उपक्रमान्वये Jio Cinema आणि Jio Hotstar या भारतातील दोन आघाडीच्या OTT स्ट्रीमिंग सेवा एकत्र आल्या आणि परिणामत: Jiostar.com निर्मिती झाली.