जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच उद्या जिओ एअर फायबर लॉन्च होणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कंपनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली होती. जिओ एअर फायबर ही एक वायरलेस वाय फाय सेवा आहे. घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. जिओ एअर फायबरच्या येण्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओ एअर फायबर जे जिओ फायबर पेक्षा वेगळे आहे. कारण हे कोणत्याही केबल किंवा वायरशिवाय घर आणि कार्यालयांमध्ये इंटरकनेक्ट करते. जिओ फायबर एक फायबर आधारित सेवा आहे. तथापि, जिओ एअर फायबर एक वायरलेस इंटरनेट सेवा आहे जी घरी सहजपणे सेट केले जाऊ शकते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : गणेश चतुर्थीला जिओ एअर फायबर लाँच करणार; मुकेश अंबानींची घोषणा

जिओ एअर फायबर : किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

जिओ एअर फायबरची किंमत काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र हे अन्य ब्रॉडबँड सेवांसह स्पर्धा करण्याची अपेक्षा आहे. एअर फायबर सेवा १.५ GBPS पर्यंतचा स्पीड ऑफर करेल. जिओ एअर फायबर सध्या काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. कंपनी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या सेवेला अधिक शहरांमध्ये विस्तारित करण्यासाठी योजना आखत आहे.

जिओ एअर फायबर : फीचर्स

जिओ एअर फायबर अनेक सुविधांसह लॉन्च होणार आहे. ज्यामध्ये हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हीटी, अनलिमिटेड डेटाचा वापर, वाय फाय ६ चा सपोर्ट आणि चांगला परफॉर्मन्स आणि OTT चे सबस्क्रिप्शन ऑफर करते. जिओ एअर फायबर पारंपरिक वायर्ड ब्रॉडबँड सर्व्हिसच्या तुलनेत सोप्या इन्स्टॉलेशनसह अनेक फायदे ऑफर करते. यासाठी त्या ठिकाणी जाऊन इन्स्टॉलेशन करण्याची आवश्यकता नाही. ही एक वायरलेस सुविधा असल्याने वापरकर्ते आपल्याबरोबर ते कुठेही घेऊन जाऊ शकतात.

जिओ एअर फायबरच्या लॉन्च होण्यामुळे भारतीय ब्रॉडबँड मकर्टवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. जिओ आपल्या नाविन्यपूर्ण योजनांसाठी ओळखले जाते. कारण जिओने अनलिमिटेड डेटा प्लॅन आणि सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन लॉन्च केला होता. जिओ एअर फायबरच्या लॉन्चिंगमुळे अन्य ब्रॉडबँड प्रोव्हायडर्सना आपली किंमत कमी करणे आणि सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत मिळू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio air fiber launch on ganesh chaturthi 1 5 gbps mukesh ambani speed wireless internet service tmb 01