Jio AirFiber Users Can Enjoy 30 Percent Discount : सध्या प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट हे लागतेच. लॉकडाऊननंतर अनेक जण अजूनही वर्क फ्रॉम होम करतात. शाळा, कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी इंटरनेटवर माहिती शोधतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण मोबाइलच्या डेटावर अवलंबून न राहता घरी वायफाय लावायचे ठरतो. तसेच हा वायफाय लावताना अनेकदा कनेक्शन कुठून जोडायचं असा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे अनेकांना वायरलेस कनेक्शन, स्पीड हे स्वस्तात हवं असतं. तर तुम्ही नवीन वायरलेस, ३० टक्के सवलतीसह एखादे नवीन कनेक्शन घेण्याचा तुम्ही विचार करीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने गेल्या वर्षी जिओ एअरफायबर लाँच केले. हे एक इंटिग्रेटेड एंड-टू-एंड सोल्यूशन आहे. ही सेवा होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस, हाय स्पीड ब्राँडबँड सेवा देते. तर नवीन ब्रॉडबँड कनेक्शन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी रिलायन्स जिओने आपल्या जिओ फ्रीडम ऑफर आणल्या आहेत. या फ्रीडम ऑफरचा एक भाग म्हणून नवीन जिओ फायबर युजर्ससाठी १००० रुपये इन्स्टॉलेशन चार्ज माफ केला जाणार आहे.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
ganeshotsav flowers marathi news
निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Farmers Problem and Bail Pola 2024 Celebration News in Marathi
Bail Pola Festival 2024 : बैलांचा साज महागला, संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे पोळ्यावर निराशेचे सावट
Nisargalipi For those who like water garden
निसर्गलिपी : वॉटरगार्डनचीआवड असणाऱ्यांसाठी…
Weight Lose Tips
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; महिनाभरात कमी होईल वजन, दिसाल फिट

हेही वाचा…Meta Removes Instagram Accounts: मेटाकडून ६३ हजार इन्स्टाग्राम खात्यांना टाळे; सेक्स्टॉर्शनसाठी तरुणांना केलं जातंय टार्गेट? नेमकं घडलंय काय?

१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार ऑफर:

नवीन जिओ फायबर युजर्सना तीन महिन्यांच्या ऑल-इन-वन प्लॅनसाठी ३,१२१ रुपये ज्यामध्ये प्लॅनसाठी २,१२१ रुपये आणि इन्स्टॉलेशन चार्जसाठी १,००० रुपये मोजावे लागतात. पण, जिओ फ्रीडम ऑफरसह, नवीन युजर्सना इन्स्टॉलेशन फी माफ केली जाते आहे; ज्यामुळे एकूण खर्च फक्त २,१२१ रुपये होईल. ही ऑफर फक्त १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत सर्व नवीन एअर फायबर युजर्ससाठी असणार आहे.

तसेच ही झिरो-इन्स्टॉलेशन ऑफर तीन महिने, सहा महिने आणि बारा महिन्यांच्या प्लॅन निवडणाऱ्या सर्व युजर्ससाठी असणार आहे. एअरफायबर 5G आणि एअरफायबर प्लस दोन्ही नवीन युजर्ससाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. जिओची हाय-स्पीड वायरलेस इंटरनेट सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिओ एअर फायबर ५ जी तंत्रज्ञान वापरून वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी देते. जिथे केबल्स वायर लावणे आव्हानात्मक ठरते आणि जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट युजर्सना प्रदान करते.