अलीकडेच खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांमधये फारसा फरक राहिलेला नाही. अनेक कंपन्यांकडून तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधा दिली जाते. दूरसंचार कंपन्यांकडे अशा अनेक पोस्टपेड योजना आहेत. आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या परवडणाऱ्या फॅमिली पोस्टपेड प्लानबद्दल सांगत आहोत.

एअरटेल ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये सुद्धा दोन फॅमिली सिम आणि एक प्राथमिक सिमची सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला एकूण १०० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळेल. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिक यांसारखी मेंबरशिप अॅमेझॉन प्राइमवर मोफत उपलब्ध आहे.

जिओचा ७९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

७९९ महिन्याच्या या पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी दोन अतिरिक्त सिम कार्डांसह एक प्राथमिक सिम दिले जाते. यामध्ये तुम्हाला एकूण १५० जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. पोस्टपेड प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अनेक OTT प्लॅटफॉर्मची सदस्यत्व मिळते. जिओच्या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टारसह जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Make in India: आयफोन १३ चं भारतात उत्पादन सुरु, किंमत कमी होण्याची शक्यता

दुसरीकडे, दूरसंचार नियामक ट्रायच्या निर्देशांनंतर, दूरसंचार कंपन्यांनी ३० आणि ३१ दिवसांसाठी प्लान्स आणले आहेत किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की कंपन्यांनी calendar Month साठी रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहेत. पण, त्यांचे रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनपेक्षा किंचित जास्त महाग आहेत.

Story img Loader