दर महिन्याला मोबाइल रिचार्ज करण्यापेक्षा एकदाच तीन महिन्यांचा रिचार्ज करणं अधिक सोयीस्कर ठरतं. परंतु, तीन महिन्यांचा सर्वात स्वस्त रिचार्ज कोणता? असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, यात आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि VI च्या तीन महिन्यांची वैधता असणाऱ्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्जची माहिती देणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट रिचार्जही दिला जातो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट डेटा मिळणार नाही. परंतु, तुम्हाला बेसिक सेवा वापरता येतील इतका डेटा दिला जातो.

Jio चा ३९५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन : जिओच्या ३९५ रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत. यामध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा तुमचा रिचार्ज करण्याचा त्रास संपेल. यात ग्राहकांना एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. यामध्ये उपलब्ध असलेला हाय स्पीड ६ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएसवर येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो. तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ हजार एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. त्याचबरोबर ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा अ‍ॅक्सेस दिला जातो.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Indians seeking asylum in USA
अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गुजराती नागरिकांची चढाओढ; आसरा मागणाऱ्यांच्या संख्येत भारतातून तीन वर्षांत ८५५ टक्क्यांची वाढ

Airtel चा ४५५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन : एअरटेलच्या ४५५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ही ८४ दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ६ जीबी डेटा दिला जातो. तसेच ग्राहकांना ९०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. त्याचबरोबर Apollo 24|7 Circle, Hellotunes आणि Wynk Music चा अ‍ॅक्सेस दिला जातो.

हे ही वाचा >> Samsung Fab Grab Fest : १२ हजारांच्या आत खरेदी करा सॅमसंगचे स्मार्टफोन्स, ७० टक्क्यांपर्यंतच्या ऑफर्स

Vodafone Idea चा ४५९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन : व्होडाफोन-आयडियाच्या ४५९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्येही जिओ आणि एअरटेलप्रमाणे अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि ६ जीबी इंटरनेट डेटा दिला जातो. याची वैधतादेखील ८४ दिवसांची आहे. यामध्ये तुम्ही तीन महिन्यांत १,००० एसएमएस पाठवू शकता. यासह तुम्हाला Vi Movies & TV Basic चा अ‍ॅक्सेस दिला जातो. यामध्ये तुम्ही लाईव्ह टीव्ही, लाईव्ह न्यूजही पाहू शकता.