आजकाल महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. रिचार्ज प्लॅनची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. त्यातच एखादा कमी किंमतीचा आणि जास्त ऑफर्स असणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल तर आपण पैसे वाचल्याबद्दल आनंदी होतो. एअरटेल, जिओ आणि वोडाफोनचे असेच काही प्लॅन्सवर कमी किंमतीत जास्त ऑफर्स देण्यात येत आहेत. ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे कोणते प्लॅन्स आहेत जाणून घ्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जिओचा ४७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
- जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यावर जिओ टीव्ही, क्लाउड या ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
- हा रिचार्ज प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
जिओचा ४१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
- जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज ३ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- यावर जिओ टीव्ही, क्लाउड या ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
- हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग
एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लॅन
- एअरटेलच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅनसह एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सबस्क्रीप्शन मिळते.
- हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
एअरटेलचा ४७९ रुपयांचा प्लॅन
- एअरटेलच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- या प्लॅनवर फ्री हॅलो ट्युन, विंक म्युजिक यांचा ॲक्सेस तसेच फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
- या प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
वोडाफोनचा ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- वोडाफोनच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅनसह डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सबस्क्रीप्शन मिळते.
- हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
वोडाफोनचा ४७५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- वोडाफोनच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- यामध्ये रोज ४ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅनसह बिंज ऑल नाईट, डेटा रोलओवर या सुविधा मिळतात.
- हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
First published on: 29-10-2022 at 18:12 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio airtel vodafone best recharge plan under 500 rupees with 4 gb data offer unlimited calling know price pns