पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त जीओचे प्रमुख मुकेश अंबानी, एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल, आणि वोडाफोन आयडियाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. आता 5जी नेटवर्क लाँच झाल्यामुळे या डिजिटल इंडियाच्या मोहिमेला नव्याने गती मिळणार आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जीओने आपली 5जी सेवा सादर केली. जीओकडून अजूनही Jio True 5जी सेवा इन्व्हिटेशनच्या माध्यमातून युजर्सना दिली जात आहे. सध्या देशातील ८ शहरात 5G सेवा उपलब्ध आहे. यात Jio True 5G सेवा ४ शहरात तर Airtel 5G Plus सर्विस ८ शहरात उपलब्ध आहे.
सध्या ‘या’ शहरांमध्ये 5G सेवा
जीओ आणि एयरटेल ने काही निवडक शहरांमध्ये 5जी सेवा लाइव्ह केली. जीओ सध्या मुंबई, दिल्ली, वाराणसी, आणि कोलकाता मध्ये आपली जीओ True 5G सेवा देत आहे. तर Airtel 5G Plus सेवा आठ शहरांमध्ये लाइव्ह आहे, ज्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदाराबाद, सिलीगुरी, नागपूर आणि वाराणसीचा समावेश आहे.
आणखी वाचा : स्मार्टफोन खरेदी करायचाय, मग आत्ताच करा! पुढचा महिना असेल महागडा! काय आहे समीकरण? जाणून घ्या…
Jio True 5G लवकरच ‘या’ शहरांमध्ये
Jio True 5G सेवा लवकरच अहमदाबाद, बेंगळुरू, चंदिगढ, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, लखनऊ आणि चेन्नई या शहरात मिळेल.
Airtel 5G Plus लवकरच ‘या’ शहरांमध्ये
Airtel 5G Plus सेवा लवकरच अहमदाबाद, गांधीनगर, गुरुग्राम, कोलकाता, पुणे, जामनगर, आणि चंदिगढ या शहरांमध्ये मिळेल.
लवकरच संपूर्ण देशात 5जी सेवा होणार उपलब्ध
एक किंवा दोन वर्षात संपूर्ण देशात ५जी नेटवर्क उपलब्ध होईल. एअरटेल मार्च २०२४ पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची 5जी सेवा उपलब्ध करेल तर जीओचे नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचेल, अशी माहिती आहे.