भारतामध्ये सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या तीन आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनी त्यांचे नवनवीन प्लॅन्स ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. यामध्ये ५ जी डेटा, एसएमएस आणि अनेक चॅनेल्स मोफत सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे; तर रिलायन्स जिओ, एअरटेल कंपनीने पुन्हा एकदा नवीन प्लॅन्स जाहीर केले आहेत, जे कंपनीचे वार्षिक मोबाइल प्रीपेड प्लॅन्स असणार आहेत. तर याच प्लॅन्सबद्दल या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

जिओ कंपनीचे वार्षिक मोबाइल प्रीपेड प्लॅन्स पुढीलप्रमाणे :

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर

पहिला प्लॅन २,९९९ रुपये : या प्लॅनमध्ये ९१२.५ जीबी डेटा, २.५ जीबी दैनिक हायस्पीड, अमर्यादित कॉल, दररोज १०० एसएमएस, प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडच्या मोफत सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे. तसेच दररोज हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग ६४ Kbps पर्यंत कमी केला जाईल.

दुसरा प्लॅन ३,३३३ रुपये : या प्लॅनमध्ये २.५ जीबी हायस्पीडसह ९१२.५ जीबी आणि अमर्यादित व्हॉईस कॉल्स मिळतात. तुम्हाला दररोज १०० एसएमएसदेखील मिळतात. तसेच जिओ सिनेमाऐवजी तुम्हाला फॅनकोडचे सबस्क्रिप्शन मिळेल. जिओ टीव्ही मोबाइल ॲपद्वारे प्रवेश करता येईल. याव्यतिरिक्त तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडमध्ये मोफत प्रवेश करता येईल.

तिसरा प्लॅन ३,२२७ रुपये : २ जीबी हायस्पीड मर्यादेसह एकूण ७३० जीबी डेटा ऑफर करते. दररोज १०० एसएमएस कॉल आणि एसएमएस अमर्यादित राहतात. या प्लॅनचा मुख्य फायदा म्हणजे प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशनचे एक वर्षाचे सदस्यत्व मिळेल; ज्यामुळे तुम्हाला चित्रपट आणि शो यांचा आनंद घेता येईल. तसेच तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सदस्यत्व मिळेल.

एअरटेल कंपनीचे वार्षिक मोबाइल प्रीपेड प्लॅन्स पुढीलप्रमाणे :

पहिला प्लॅन ३,३५९ रुपये : हा दिवसाला तुम्हाला २.५ जीबी डेटा देते. संपूर्ण वर्षासाठी एकूण ९१२.५ जीबी डेटा. युजर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर (स्थानिक, STD आणि रोमिंग) कॉल अमर्यादित आहेत. तसेच तुम्हाला दररोज १०० एसएमएस, डिस्ने+हॉटस्टार मोबाइलची एक वर्षाची मोफत सदस्यता देते; ज्यामुळे वापरकर्ते चित्रपट, टीव्ही शो आणि स्पोर्ट्स पाहू शकतात. याव्यतिरिक्त तीन महिन्यांसाठी अपोलो २४ / ७ सर्कलमध्ये मोफत प्रवेश, विनामूल्य HelloTunes , पॉडकास्टसाठी विंक म्युझिक सदस्यता या प्लॅनमध्ये आहे.

दुसरा प्लॅन २,९९९ रुपये : हा प्लॅन दररोज २ जीबी डेटा ऑफर करते. वर्षभरासाठी एकूण ७३० जीबी. भारतातील सर्व नेटवर्कवर कॉल अमर्यादित आहेत आणि तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. हे वापरकर्त्यांना Apollo 24|7 सदस्यत्वाची तीन महिन्यांची ऑफर, याव्यतिरिक्त वापरकर्त्यांना विनामूल्य HelloTunes आणि Wynk Music सबस्क्रिप्शनसह, पॉडकास्टसुद्धा ऐकण्याची संधी मिळेल.

तिसरा प्लॅन १,७९९ रुपये : या प्लॅनवर Airtel संपूर्ण वर्षासाठी एकूण २४ जीबी डेटा ऑफर करते; जे दररोज अंदाजे ६६.७ एमबी युजर्सना मिळेल. भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल अमर्यादित, ३,६०० एसएमएस, वापरकर्त्यांना अपोलो 24|7 सर्कलमध्ये तीन महिन्यांचा मोफत प्रवेश, फ्री HelloTunes सह रिंगटोन सेट करण्याची परवानगी, पॉडकास्ट, विंक म्युझिक सदस्यत्वाच्या फायद्यांचा ग्राहकांना लाभ घेता येईल.

Story img Loader