गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात Airtel आणि Reliance Jio या दोन्ही कंपन्यांनी भारतात 5G सेवा सुरू केल्या. त्यानंतर या कंपन्यांचे कव्हरेज हे अवघ्या तीन महिन्यांत झपाट्याने वाढले आहे. जिओ ५जी आता भारतातील ८५ शहरांमध्ये उपलब्ध झाले आहे. आणि एअरटेल ५जी २५ शहरांमध्ये उपलब्ध आहे. सध्या, Jio true ५जी वेलकम ऑफर अंतर्गत निवडक वापरकर्त्यांना अमर्यादित ५जी डेटा ऑफर करत आहे.एअरटेल ५जी नेटवर्कवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. जिओने अलीकडेच आपला पहिला ५जी डेटा पॅक लॉन्च केला जो वापरकर्त्यांना ६१ रुपयांमध्ये ६जीबी डेटा देतो. तरीसुद्धा ५जी डेटाच्या किंमती या तपशीलवार नसल्या तरीदेखील या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी वापरकर्त्यांना सिमकार्ड न बदलता ५जी सेवा अपग्रेड करून देत आहेत. आता दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स कोणकोणते आहेत ते पाहुयात.

डेली १.५जीबीचा डेटा प्लॅन

Airtel

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
Jet Airways Air Service Industry Employment of employees
जेट एअरवेज: उदय-अस्ताचा ३२ वर्षांचा प्रवास
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

एअरटेलने अनेक असे प्लॅन्स आपल्या वापकर्त्यांसाठी आणले आहेत ज्यामध्ये रोज १.५ जीबी डेटा वापरता येतो. यामध्ये सर्वात स्वस्त हा २८ दिवसांसाठी २९९ रुपयांचा प्लॅन आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस रोज करता येतात. तसेच तीन महिन्यांसाठी मोफतपणे Apollo 24|7 Circle ची मेंबरशिप व Wynk Music App मोफत वापरायला मिळते.

Reliance JIo

रिलायन्स जीओचा देखील असाच एक प्लॅन आहे ज्याची किंमत ही २३९ रुपये आहे. यातसुद्धा तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस रोज करता येतात. यात जिओ टीव्ही , जिओ सिनेमा , जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारखे अतिरिक्त फायदे वापरकर्त्यांना मिळतात.

हेही वाचा : Google Pixel च्या स्मार्टफोन्सना भारतात ‘या’ कंपन्या करणार ५जी नेटवर्कसाठी सपोर्ट

डेली २ जीबीचा डेटा प्लॅन

Airtel

दररोज २ जीबी डेटा वापरण्यासाठी एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ३१९ रुपयांचा आहे. तो ३० दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस रोज करता येतात. तसेच तीन महिन्यांसाठी मोफतपणे Apollo 24|7 Circle ची मेंबरशिप व Wynk Music App मोफत वापरायला मिळते.

Reliance Jio

जिओचे अनेक असे प्लॅन्स आहेत त्यामध्ये दररोज २ जीबी डेटा येतो. २९९ रुपयांचा हा प्लॅन असून २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. हा २ जीबी डेटा साठी जीओचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यातसुद्धा तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस रोज करता येतात. यात जिओ टीव्ही , जिओ सिनेमा , जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारखे अतिरिक्त फायदे वापरकर्त्यांना मिळतात.

डेली २.५ जीबीचा डेटा प्लॅन

Airtel

तुम्ही जर एअरटेलचे वापरकर्ते असल्यास आणि अधिक डेटा देणारा प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल तर, डेली २.५ जीबी डेटासाठी ३९९ रुपयांचा जीओचा स्वस्त प्लॅन आहे. यात अनलिमिटेड कॉल्स , १०० एसएमएस आणि याशिवाय डिझनी +हॉटस्टार मोबाईल सोबत , मोफत Wynk Music App , मोफत हॅलो ट्यून्स, तीन महिन्यांसाठी मोफतपणे Apollo 24|7 Circle चे सब्स्क्रिप्शन मिळते.

Reliance Jio

२.५ जीबी डेली डेटासाठी रिलायन्स जिओसाठी २०२३ रुपयांचा प्लॅन आहे. हा प्लॅन २५२ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. यातसुद्धा तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस रोज करता येतात. यात जिओ टीव्ही , जिओ सिनेमा , जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारखे अतिरिक्त फायदे वापरकर्त्यांना मिळतात.

हेही वाचा : नवीन वर्षात iPhone अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

डेली ३ जीबीचा डेटा प्लॅन

Airtel

३ जीबी डेटा दररोज देणारे एअरटेलचे दोन प्लॅन आहेत. यात पहिल्याची किंमत ४९९ रुपये असून हा प्लॅन २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. यात अनलिमिटेड कॉल्स , डिझनी + हॉटस्टार मोबाईलवर तीन महिन्यांसाठी मोफत मिळते. दररोज १०० एसएमएस देखील मोफत मिळतात.

एअरटेलचा ३ जीबी डेटासाठी दुसरा प्लॅन हा ६९९ रुपयांचा आहे. हा प्लॅन ५६ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. यात ५६ दिवसांची Amazon प्राईम मेंबरशिप आणि Airtel Xstream अ‍ॅपवर एक चॅनल वापरकर्त्यांना वापरायला मिळते. दोन्ही प्लॅन्समध्ये तीन महिने Apollo 24|7 सर्कल सबस्क्रिप्शन, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk Music उपलब्ध आहे.

Reliance Jio

एअरटेल सारखेच जिओकडेही दोन ३ जीबी डेटा असणारे प्लॅन्स आहेत. पहिल्या प्लॅन्सची किंमत ४१९ रुपये प्रतिमहिना आहे आणि तो २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. तर दुसरा प्लॅन ८४ दिवसांसाठी व्हॅलिड असून त्याची किंमत ११९९ रुपये इतकी आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये वरील प्लॅन्सप्रमाणेच सर्व फायदे वापरकर्त्यांना वापरायला मिळतात.

हेही वाचा : WhatsApp New Feature: अँड्रॉइडवर शेअर करता येणार डेटा; काय आहे नवे फीचर जाणून घ्या

Airtel की Jio : तुम्ही कोणते निवडाल ?

सर्वोत्तम प्रीपेड डेटा प्लॅन हा वापरकर्त्याच्या वापरानुसार वेगवेगळा असू शकतो. तुम्हाला दररोज २ जीबी डेटाची आवश्यकता नसल्यास जिओकडे एअरटेलच्या तुलनेत स्वस्त प्लॅन्स आहेत. जर का तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा देणारा प्लॅन्स हवा असेल आणि जास्त पैसे गुंतवायचे नसतील तर, तुम्ही फक्त एअरटेल ३९९ रुपयांचा प्लॅन वापरू शकता.