Prepaid Recharge Plans Of Airtel And Jio : सध्या रिचार्ज प्लॅनचे पैसे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आपल्या देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. प्लॅनच्या किमतीत अचानक दुप्पट वाढ झाल्याने लोक त्यांचे नंबरही स्विच करण्याचा निर्णय तर दुसरीकडे प्रत्येक जण स्वस्त प्लॅन बघत आहे. आपले ग्राहक इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून तर टेलिकॉम कंपन्यांनीआपल्या ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅनसुद्धा घेऊन येत आहेत. जर तुम्ही ५०० रुपयांच्या आतमध्ये (Recharge Plans Under 500) एखादा प्रीपेड रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी चार पर्याय घेऊन आलो आहोत.

५०० रुपयांच्या आतमध्ये येणारे जिओचे रिचार्ज प्लॅन्स : (Recharge Plans Under 500)

१. जिओचा ४४८ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता, दिवसाला २ जीबी डेटा (महिन्याला ५६ जीबी डेटा ), प्रत्येक नेटकवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि त्याचबरोबर १२ ओटीटी ॲपचे सबस्क्रिप्शन ज्यामध्ये सोनीलिव , झी ५, जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही आदी अनेक ॲप्सचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

२. जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता, दिवसाला २.५ जीबी डेटा , प्रत्येक नेटकवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि त्याचबरोबर जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड यांसारख्या स्टोरेजमध्ये प्रवेश करण्याचा ॲक्सेस देईल.

५०० रुपयांच्या आतमध्ये येणारे एअरटेलचे प्रीपेड प्लॅन्स (Recharge Plans Under 500)

एरटेलचा ४८९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला ७७ दिवसांची वैधता, ६ जीबी डेटा, ६०० एसएमएस आणि प्रत्येक नेटकवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिले जाणार आहे. या प्लानमध्ये Hello Tunes, आणि Apollo 24|7 सर्कल सारखे फायदे मिळतात.

एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता, दिवसाला ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि प्रत्येक नेटकवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिले जाणार आहे. तसेच २२ ॲपचे सबस्क्रिप्शनसह एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाईल. त्याचबरोबर अपोलो २४/७ सर्कल, डेटा संपल्यावर ५ जी नेटवर्कमध्ये डेटा वापरण्याची सोय, Hello Tunes, स्पॅम-फायटिंग नेटवर् आदींचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात.

तुम्ही कोणता प्लॅन निवडावा? (Recharge Plans Under 500)

जर तुम्ही जास्त व्हॅलिडिटी असणारा डेटा पॅक शोधत असाल तर, तर एअरटेलचा ४८९ रुपयांचा प्लॅन एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना हाय-स्पीड डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी ४४९ रुपयांचा प्लॅन ५ जी ॲक्सेस आणि ओटीटी सबस्क्रिप्शन देते. दुसरीकडे, जिओचा ४४८ रुपयांचा प्लॅन २ जीबी दैनंदिन डेटा आणि १२ ओटीटी ॲप्समध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करतो, त्यामुळे मनोरंजन प्रेमींसाठी योग्य आहे. त्यामुळे तुमच्या गरजा पूर्ण होतील असा प्लॅन निवडा.

Story img Loader