Airtel vs Jio vs Vi Prepaid Plan, Diwali 2022: दिवाळीच्या खर्चाचे आकडे पाहता दिवाळं निघायची वेळ येईल की काय असा प्रश्न पप्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात येतोच. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की यंदाच्या दिवाळीत तुम्ही चक्क पैसे वाचवू शकणार आहात, तर? हेच हवं होतं ना.. मंडळी आज आपण एअरटेल, जिओ व व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्ही या सिमकार्डसचे काही स्वस्तात स्वस्त रिचार्ज प्लॅन पाहणार आहोत. जर तुम्हाला कामानिमित्त केवळ अधिक इंटरनेटची गरज असेल किंवा बाहेर फिरायला जाताना रोमिंगचा खर्च टाळायचा असेल तर हे प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊयात रिचार्ज प्लॅनची दिवाळी बंपर ऑफर..
एअरटेल
एअरटेलच्या २०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २१दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रति दिन १ जीबी इंटरनेट डेटा ग्राहकांना दिला जातो. जर दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करत असाल तर प्रवासासाठी ही एक चांगली ऑफर आहे.
जर तुम्हाला जास्त डेटाची गरज नसेल, तर तुम्ही एअरटेलच्या १५५ आणि १७९ च्या प्लॅनचा विचार करू शकता ज्यात अनुक्रमे 24 आणि 28 दिवसांसाठी १ जीबी व २ जीबी डेटा दिला जातो. तुमच्याकडे आधीच वैध अमर्यादित योजना असल्यास, फक्त अधिक डेटाची आवश्यकता असल्यास, तुम्ही डेटा बूस्टर पॅक देखील तपासू शकता. 148 रुपयांचा प्लॅन तुम्हाला तुमच्या विद्यमान वैधतेवर १५ जीबी अधिक डेटा देतो, तर ११८ रुपयांचा प्लॅन तुम्हाला १२ जीबी, ९८ रुपयांचा प्लॅन ५ जीबी व ५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ जीबी डेटा ऑफर केला जातो.
जिओ
जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २० दिवसांसाठी १ जीबी डेटा, प्रतिदिन १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची ऑफर दिली जाते. तर १७९ रुपयांच्या आणि २०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनुक्रमे २४ दिवस आणि २८ दिवसांसाठी समान फायदे मिळवता येतील. जर आपकयला अधिक डेटाची आवश्यकता असेल तर आपण जिओचा १५५ रुपयांचा प्लॅनसुद्धा विचारात घेऊ शकता यामध्ये आपल्याला २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि २ जीबी डेटा मिळू शकतो .
जिओ वापरकर्त्यांसाठी काही डेटा बूस्टर प्लॅनसुद्धा उपलब्ध आहेत. ज्यांना फक्त अधिक डेटाची आवश्यकता आहे असे वापरकर्ते २५ रुपयांमध्ये अतिरिक्त २ जीबी, ६१ रुपयांमध्ये ६ जीबी आणि १२१ रुपयांमध्ये १२ जीबी डेटा मिळवू शकतात.
व्होडाफोन आयडिया
व्होडाफोन आयडियाचा २६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉल, १०० एसएमएस, प्रतिदिन १ जीबी डेटा उपलब्ध होतो. तर २३४ रुपयांच्या प्लॅनमध्ये आपण केवळ २४ दिवसांसाठी समान फायद्यांचा लाभ घेऊ शकता. याशिवाय १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १८ दिवस सर्व सुविधा आपण वापरू शकता. व्होडाफोन आयडियाचं १४९, १५५ व २०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनुक्रमाने २१ दिवसांसाठी १ जीबी डेटा, २४ दिवसांसाठी १ जीबी डेटा व २८ दिवस ४ जीबी एकूण डेटा उपलब्ध आहे.
अतिरिक्त डेटा हवा असल्यास Vi १५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar सदस्यत्वासह ३० दिवसांसाठी ८ जीबी डेटा उपलब्ध होतो तसेच, ८२ रुपयांच्या प्लॅनमध्ये १४ दिवसांसाठी ४ जीबी डेटा आणि ११८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी १२ जीबी डेटा सुद्धा कंपनी ऑफर करते.