Jio Launch new plan: Reliance Jio नं आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन डेटा पॅक लाँच केला आहे. या पॅकचा उद्देश्य ग्राहकांसाठी फक्त अतिरिक्त डेटा देत नाही तर त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा देणे देखील आहे. Reliance Jio कंपनी तीन महिन्यांचा एक प्लॅन ऑफर करत आहे. तुम्हाला यात रोज फ्री 2GB डेटासह OTT चा देखील आनंद घेता येईल. चल तर मग जाणून घेऊया. दरवाढीनंतर Reliance Jio ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन जोडले आहेत, जे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूप फायदेशीर आहेत. Reliance Jio कंपनी तीन महिन्यांचे अनेक प्लॅन ऑफर करते जे चांगल्या इंटरनेट डेटासह आणि विनामूल्य अनेक फायदे देत आहेत.
Reliance Jio ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी खास अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन आणला आहे. या प्लॅनची वैधता ९० दिवसांची आहे. MyJio App किंवा Jio Official Website वरून ८९९ रुपयांत खरेदी करता येईल. प्लॅनमध्ये युजर्सला ९० दिवस म्हणजेच पूर्ण ३ महिन्यांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सला रोज २ GB हायस्पीड इंटरनेट मिळते. म्हणजेच ९० दिवसांसाठी Reliance Jio कंपनी १८० GB डेटाचा लाभ देत आहे. पण थांबा, डेटा तर त्याहूनही जास्त दिला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला २० GB डेटा फ्री मिळत आहे, ज्यामुळे एकूण डेटाचा फायदा २०० GB होतो. हा Reliance Jio प्लॅन इंटरनेट डेटाच्या बाबतीत मोठा फायदा मिळवून देतो.
याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग प्लॅनमुळे युजर यात अनलिमिटेड कॉल करू शकतो. यासोबतच रोज १०० SMS मोफत पाठवण्याचीही सुविधा आहे. डेटा कोटा संपल्यानंतरही इंटरनेट ६४kbps च्या वेगाने सुरू राहणार आहे. एवढंच नाही तर या प्लॅनसोबत पात्र ग्राहकांना अनलिमिटेड ५G डेटा देखील दिला जात आहे. यासोबतच Jio App वरही मनोरंजनाचा आनंद लुटता येणार आहे.