दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. मोबाईल रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. प्रत्येक कंपनीकडून मोबाईल रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे. अशात सर्वात स्वस्त प्लॅन कोणता? कोणतता प्लॅन घेतल्याने सर्वाधिक फायदा मिळेल? याचा विचार आपण करतो. जर तुम्हीदेखील वर्षभरासाठी एखाद्या स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर तुम्ही जिओच्या प्लॅनचा नक्की विचार करू शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये स्वस्त दरात वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा उपलब्ध आहे. काय आहे जिओचा हा प्लॅन आणि याच्या तुलनेत एअरटेल आणि वोडाफोनचा वर्षभरासाठीचा काय प्लॅन आहे जाणून घेऊया.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जिओचा प्लॅन
- जिओच्या २,८७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी दरदिवशी २ जीबी डेटा उपलब्ध आहे.
- ज्यामध्ये एकूण ७३० जीबी डेटा उपलब्ध होतो.
- हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएस इतकी कमी होते.
- यासह अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन १०० मेसेज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- तसेच या प्लॅनमधून जिओ ॲप्सचा ॲक्सेस देखील मोफत उपलब्ध होतो.
Smartphone Price Hike: लवकरच स्मार्टफोन होणार महाग; जाणून घ्या कारण
एअरटेलचा प्लॅन
- एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी दरदिवशी २ जीबी डेटा उपलब्ध आहे.
- वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन १०० मेसेज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- अपोलो 24/7 सर्कल (Apollo 24|7 Circle), फास्टट्रॅक वर १०० रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलोट्युनस,आणि विंक म्युजिक या गोष्टींचा वापर मोफत करता येतो.
वोडाफोन आयडियाचा प्लॅन
- वोडाफोनच्या २,८९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी दरदिवशी १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे.
- वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन १०० मेसेज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- तसेच या प्लॅनमध्ये रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत एक्स्ट्रा डेटा उपलब्ध होतो.
- वी मुव्हीज आणि टीव्ही क्लासिक यांचा ॲक्सेस मोफत उपलब्ध होतो.
First published on: 27-08-2022 at 15:00 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio cheapest yearly plan with unlimited calling and 2 gb data per day know more pns