रिलायन्स जिओ हे देशातील सर्वांत मोठे नेटवर्क असलेली कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर घेऊन येत असते. आता कंपनी प्रजासत्ताक दिनानिमित्त एका आकर्षक प्लॅनची घोषणा केली आहे. जिओने २,९९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाॅंच केला आहे. जिओचा ३६५ दिवसांचा हा खास ऑफरयुक्त प्लॅन २.५ जीबी ४जीसाठी, अमर्यादित ५जी डेटा व अमर्यादित काॅल्स देणार आहे.

जर १५ ते २० जानेवारीदरम्यान ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये जिओचा २३० रुपयांचा महिन्याचा प्लॅन रिचार्ज केला, तर त्यांना काही अतिरिक्त फायदे दिले जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ही ऑफर म्हणजे ग्राहकांसाठी एक सोनेरी डील ठरेल. कारण- यामध्ये स्विगी (Swiggy), अजिओ (Ajio) कूपन, इक्सिगो (Ixigo)द्वारे फ्लाइटवर सूट, ‘रिलायन्स डिजिटल’मधील निवडक उत्पादनांवर १० टक्के सूट आदी अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. तर, काय आहेत त्या ऑफर्स चला पाहू…

Loksatta editorial India dominates Chess Olympiad Tournament
अग्रलेख: सुखद स्वयंप्रज्ञेचे सुचिन्ह!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
saudi arabia neom project
सौदी अरेबिया वाळवंटात वसवतंय अक्षय्य उर्जेवर चालणारं जगातील पहिलं शहर; काय आहे ‘प्रोजेक्ट निओम’? या प्रकल्पावरून सुरू असलेला वाद काय?
Sebi approves Hyundai and Swiggy IPOs print eco news
‘सेबी’कडून ह्युंदाई आणि स्विगीच्या महाकाय आयपीओंना मंजुरी; दोन्ही कंपन्यांकडून ३५,००० कोटींची निधी उभारणी अपेक्षित
loksatta kutuhal What are the major language formats
कुतूहल: विशाल भाषा प्रारूपे काय आहेत?
bucha witches
रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?
port blair name changed
पोर्ट ब्लेअर शहराच्या नावामागचा इतिहास काय? केंद्र सरकारने का केले शहराचे नामकरण?
Port Blair Who is Archibald Blair
Port Blair : ‘या’ इंग्रजाच्या नावावरून ईस्ट इंडिया कंपनीने अंदमानच्या राजधानीला पोर्ट ब्लेअर नाव दिलेलं, मोदी सरकारने केलं नामांतर

हेही वाचा…Amazon Sale 2024: अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक सेलमध्ये ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स; जाणून घ्या…

प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरअंतर्गत जिओ ग्राहक ‘रिलायन्स डिजिटल’मधील निवडक उत्पादनांवर १० टक्के सवलतींचा लाभ घेऊ शकणार आहेत. ग्राहकांना जास्तीत जास्त पाच हजार‌ रुपयांपर्यंत खरेदी करावी‌ लागेल. ज्या ग्राहकांनी १० लाखांपर्यंतचे गॅझेट्स खरेदी केले असतील त्यांना १० हजारांपर्यंत सूट मिळणार आहे.

याव्यतिरिक्त जिओ प्रत्येकी १२५ रुपये किमतीच्या दोन स्विगी कूपनची ऑफरही देत आहे; ज्यात २९९ रुपयांपेक्षा जास्त किमतीवर ग्राहक रिडीम करू शकणार आहेत. तसेच ग्राहकांना इक्सिगो कूपन मिळेल; ज्यामुळे फ्लाइट तिकिटांच्या किमतीत सवलत मिळेल. त्यामध्ये ग्राहकांना तीन प्रवाशांच्या गटासाठी १,५०० रुपये, दोन प्रवाशांसाठी १,००० रुपये व एका तिकिटासाठी ५०० रुपये सवलत मिळणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्‍या ऑफरमध्‍ये २,४९९ रुपयांपेक्षा जास्त रकमेच्‍या खरेदीवर ५०० रुपयांचे Ajio कूपनदेखील समाविष्ट आहे. त्याशिवाय Tira येथे ९९९ रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या निवडक उत्पादनांवर ३० टक्के सवलत मिळू शकते. तर या खास ऑफर्स प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राहकांना देण्यात येणार आहेत.