Jio Diwali Dhamaka offers for customers : हायस्पीड इंटरनेट सुविधेचा उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत उपयोग होत आहे. दरम्यान, इंटरनेट, तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने या क्षेत्रात ‘जिओ एअर फायबर’ (Jio AirFiber) ग्राहकांसाठी आणला आणि वायरलेस तंत्रज्ञान वापरून भारतभरात वायरलेस ब्रॉडबँड सेवा सुरू केली. तर आता दिवाळीनिमित्त (Diwali) रिलायन्स ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल मंगळवारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) ग्राहकांसाठी “दिवाळी धमाका” (Diwali) ही ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये जिओ फायबर वापरणाऱ्या जुन्या व नव्या युजर्सना मोफत (फ्री) एक वर्षाचे सबस्क्रिप्शनदेखील दिलं जाईल. सर्वात स्वस्त वार्षिक जिओ एअर फायबर (Jio AirFiber) प्लॅनची ​​किंमत लक्षात घेता किमान ७,१८८ रुपयांची ऑफर १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. .

हेही वाचा…Apple : ॲपल पेन्सिल, एअरपॉड्स मोफत मिळविण्याची संधी; कोणत्या प्रॉडक्टवर किती सूट, तर कधीपर्यंत असणार ही ऑफर? घ्या जाणून…

दिवाळी (Diwali) धमाका ऑफर काय आहे? तुम्ही याचा फायदा घेऊ शकता का ?

ही ऑफर सध्याच्या नवीन एअरफायबर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. नवीन युजर्स Jio AirFiber साठी १२ महिन्याचे रिचार्ज कूपन मिळविण्यासाठी रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून किमान २०,००० रुपयांची खरेदी करावी लागेल. फ्री सबस्क्रिप्शनसाठी ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, इतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे यांसारख्या उत्पादनांची खरेदी करावी लागेल.

ज्यांच्याकडे आधीच जिओ एअरफायबर (Jio AirFiber) आहे, अशा ग्राहकांना २,२२२ रुपयांचे दिवाळी (Diwali) रिचार्ज आणि १२ महिन्यांचे एअरफायबर रिचार्ज कूपनदेखील दिले जाईल. ही कूपन नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वैध असतील. तसेच नवीन व आधीचे जिओ एअरफायबर (Jio AirFiber) युजर्स सहजपणे याचा लाभ घेऊ शकतात.

जिओ एअर फायबर ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या आवश्यकतेमुळे निवडक ठिकाणांपुरते मर्यादित आहे. जिओ एअर फायबर ५जी सेल्युलर रिसेप्शनसह देशात कुठेही स्थापित केले जाऊ शकते. याशिवाय, प्रत्येक जिओ एअरफायबर्स कनेक्शनसह वापरकर्त्यांना ८०० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि १२ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सदस्यतादेखील मिळेल

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio diwali dhamaka offers free one year jio airfiber subscription for users how can one claim it asp