Reliance Jio देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी जिओ नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. IPL २०२३ च्या निमित्त क्रिकेटप्रेमींसाठी जिओने काही रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. आयपीएलच्या आधी कंपनीने Jio Fiber प्लॅन लॉन्च केला आहे. JioFiber बॅक-अप प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना ब्रॉडबँड कनेक्शनचा वेग वाढवण्याचा पर्याय देत आहे. या नवीन प्लॅनमुळे वापरकर्ते त्यांच्या ब्रॉडबँड कनेक्शनचा स्पीड हा 10Mbps वरून 30/100Mbps पर्यंत वाढवू शकतात. नवीन बॅक-अप प्लॅनसह यामध्ये वापरकर्त्यांना २४×७ एक विश्वसनीय असा बॅक-अप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
१९८ रुपयांचा जिओ बॅकअप प्लॅन
जिओ फायबरने १९८ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी १० MBPS चा स्पीड आणि अनलिमिटेड होम ब्रॉडबँड इंटरनेट ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड लॅनलाईन व्हॉइस कॉल्स करता येणार आहेत. याशिवाय एका क्लिकवर तुम्हाला तुमचा ब्रॉडबँड स्पीड अपग्रेड करता येणार आहे.
जिओ फायबरच्या नवीन बॅकअप प्लॅनसह वापरकर्ते केवळ १०० /२०० रुपयांमध्ये अनलिमिटेड मनोरंजन अनुभवता येणार आहे. वापरकर्ते जिओ सिनेमासह , मल्टिपल कॅमेरा अँगल्स , लाईव्ह आणि फ्री IPL चा आनंद घेऊ शकतात. याशिवाय ५५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्ससुद्धा तुम्हाला बघता येणार आहेत. तसेच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 14 OTT App चा अॅक्सेस या प्लॅनमध्ये मिळणार आहे.
जिओ फायबर बॅकअप प्लॅन तुम्हाला १४९० रुपयांमध्ये ५ महिन्यांसाठी घेता येणार आहे. यामध्ये ९९० रुपये हे प्लॅनचे आणि ५०० रुपये हे इन्स्टॉलेशन चार्जेसचे आहेत. वापरकर्ते ५ महिन्यांसाठी ५००/१०००/१००/२०० रुपये देऊन अपग्रेड करू शकणार आहेत.
जर का तुम्हाला जिओ फायबरचे नवीन कनेक्शन बुक करायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.
१. ६०००८ ६०००८ या नंबरवर मिस्डकॉल द्यावा.
२. त्यानंतर jio.com/fiber साइटवर भेट द्यावी.
३. आपल्या जवळ असणाऱ्या जिओ रिटेलरकडे जाऊन ९९ रुपयांमध्ये तुमचे बॅकअप कनेक्शन बुक करा.