JioHotstar Subscription Offer Extended For 15 Days : सध्या सर्वत्र आयपीएलची क्रेझ बघायला मिळते आहे. २२ मार्च रोजी सुरू झालेली आयपील २५ मे पर्यंत चालेल. आपल्यातील बरेच जण टीव्ही, मोबाईल वा इतर डिव्हाइसवर आयपील पाहतात. तसेच मोबाईलवर आयपीलची मजा घेण्यासाठी अनेक कंपन्या खास रिचार्ज प्लॅन्सदेखील ऑफर करत असतात. त्यामध्ये जिओ सगळ्यात टॉपला आहे. तर आता जिओ आयपीएल चाहत्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर घेऊन आला आहे. तुमच्यासाठी ४ रिचार्ज प्लॅन्सवर मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे.
आयपीएलचे डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर जिओहॉटस्टारद्वारे डिजिटल स्ट्रीमिंगदेखील केले जात आहे. ग्राहकांना विविध मोफत फायदे देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिओने २०१६ मध्ये मोफत कॉलिंग सुरू करून भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला. तर आता जिओ आयपीएल चाहत्यांना आणखीन खूश करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता निवडक प्लॅनसह मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देणार आहे.
ही ऑफर २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनसाठी उपलब्ध असणार आहे, ज्यामध्ये किमान १.५ जीबी डेटाचा समावेश असेल. २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनवर असलेले लोक ९० दिवसांसाठी मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनसाठीही आयपील स्पेशल ऑफर ३१ मार्च २०२५ रोजी संपणार होती. पण, अलीकडेच ती ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही रोमांचक ऑफर नवीन युजर्स आणि आधीचे जिओ ग्राहक दोघांसाठीही उपलब्ध आहे.
९० दिवसांसाठी मोफत जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन (Recharge Plans With JioHotstar Subscription) :
याव्यतिरिक्त जिओ त्यांच्या ३४९ रुपये, ८९९ रुपये व ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देत आहे. ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आहे, ज्यामध्ये युजर्सना दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग, मोफत एसएमएस दिले जातात. दरम्यान, ८९९ रुपये व ९९९ रुपयांच्या प्लॅनची निवड करणाऱ्या युजर्सना ८४ दिवसांची वाढीव वैधता दिली जात आहे.
दरम्यान, जानेवारी २०२५ च्या ट्रायच्या आकडेवारीनुसार, जिओने सहा लाखांहून अधिक नवीन ग्राहक मिळवले आहेत. या यशामुळे जिओचा एकूण बाजार हिस्सा ४०.४६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण युजर्सची संख्या ४६.५८ कोटी झाली आहे.