Jio Recharge With Hotstar Subscription Benefit : जिओ स्टारने ‘जिओ हॉटस्टार’ (JioHotstar) हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. युजर जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट एकाच ठिकाणी पाहू शकणार आहोत. तर, जिओ हॉटस्टार हा खास ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. कारण- यावर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) अशा भारतातील या दोन्ही लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा ‘लाइव्ह’ बघण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे सब्स्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. जिओ हॉटस्टारचा हा सब्स्क्रिप्शन (Hotstar Subscription) प्लॅन अगदी तीन महिन्यांसाठीसुद्धा उपलब्ध आहे, ज्याची किंमत १४९ रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, जिओ वापरणारे युजर्स आता हा तीन महिन्यांचा सब्स्क्रिप्शन प्लॅन (Hotstar Subscription) विकत न घेता जिओ हॉटस्टारमध्ये मोफत प्रवेश मिळवू शकणार आहेत. तुम्ही जर जिओ युजर्स असाल, तर ९४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह जिओ हॉटस्टारवर तुम्हाला मोफत प्रवेश मिळू शकेल.

जिओ हॉटस्टारमध्ये मोफत प्रवेश

Jio.com वर उपडेट केलेल्या माहितीनुसार भारतीय दूरसंचार ऑपरेटर जिओ ९४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह विनामूल्य जिओ हॉटस्टारचा मोबाईल सब्स्क्रिप्शन प्लॅन (Hotstar Subscription) ऑफर करीत आहे. हा प्लॅन ८४ दिवसांची वैधता, २ जीबी हाय-स्पीड ४ जी डेटा व अमर्यादित ५ जी डेटासह येतो. त्याव्यतिरिक्त यात अमर्यादित कॉल, दररोज १०० एसएमएससुद्धा युजर्सना दिले जातात.

तसेच अतिरिक्त जिओ हॉटस्टारचा मोबाईल सब्स्क्रिप्शन प्लॅन ॲड-सपोर्टेड आहे. तसेच युजर्स एका वेळी एकाच मोबाईल डिव्हाइसवर लाइव्ह स्पोर्ट्स, नवीन चित्रपट आणि Disney+ originals सह सर्व कन्टेंटमध्ये प्रवेश करू शकतात. पण, या प्लॅनमध्ये कन्टेंट स्ट्रीमिंग 720p रिझोल्युशनवर प्रतिबंधित आहे.

रिचार्ज प्लॅनबरोबर येणारा मोबाईल सब्स्क्रिप्शन प्लॅन वगळल्यास, जिओ हॉटस्टारच्या २९९ रुपयांच्या सुपर सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये तुम्हाला तीन महिन्यांचा अ‍ॅक्सेस, तर 1080p रिझोल्युशनमध्ये तुम्ही कन्टेंट पाहू शकता. तसेच ४९९ रुपयांच्या प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये तीन महिने आणि १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभराचा अ‍ॅक्सेस दिला जाईल आणि तुम्हाला कन्टेंटसाठी 4K क्वॉलिटी मिळेल.