Jio installs 1 lakh towers in india: रिलायन्स जिओ ही सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचे ग्राहक सध्या देशभरामध्ये पसरले आहेत. या कंपनीद्वारे भारतामध्ये 4G नेटवर्कची सुविधा सुरु करण्यात आली होती. त्यांच्या या कृतीमुळे टेलिकॉम क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ग्राहकांसाठी 5G नेटवर्कची सेवा सुरु केली. ग्राहकांना या नेटवर्कचा अनुभव घेता यावा म्हणून जिओमार्फत भारतभर १ लाख टॉवर्सची उभारणी केली आहे. हा आकडा त्यांच्या अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये पाचपट आहे. दूरसंचाल विभागाच्या एका अहवालानुसार, जिओकडे ९९,८९७ बीटीएस (Base transfer station) आहेत. याविरुद्ध भारती एअरटेल या त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीकडे २२,२१९ बीटीएस आहेत. या आकड्यांवरुनच जिओने स्पर्धेमध्ये किती पुढे आहे हे दिसून येते.
Jio द्वारे भारतभर उभारण्यात आले १ लाख टॉवर्स; सामान्य नागरिकांना वापरता येणार हायस्पीड 5G नेटवर्क
Jio installs 1 lakh towers in india: रिलायन्स जिओच्या या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य माणसाला 5G नेटवर्कचा सहज लाभ घेता येणार आहे.
Written by टेक्नॉलॉजी न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-03-2023 at 10:51 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio installs 1 lakh towers in india emphasis on increasing 5g network service know more yps