Jio Recharge Plan : काही महिन्यांपूर्वी जिओ व एअरटेलने त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली होती. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे अनेक जणांनी त्यांच्या सिम दुसऱ्या कंपनीच्या सिममध्ये पोर्ट सुद्धा केले. रिचार्ज प्लॅन्सच्या नवीन किंमती पाहता ९० दिवसांचा रिचार्ज कारण्याएवजी अनेक युजर्स २८ दिवसांचा रिचार्ज करू लागले. पण, या सगळ्यात जिओ ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) घेऊन येत असते. अशातच रिलायन्स जिओ कंपनी त्यांच्या स्वस्तात मस्त मोबाईल प्लॅन्ससाठी ओळखली जाते. तर आता जिओने नवीन ९८ दिवसीय प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. काय असणार या प्लॅनमध्ये खास चला जाणून घेऊयात.

१. ९८ दिवसांचा हा रिचार्ज प्लॅनची किंमत ९९९ रुपये असणार आहे. तसेच हा प्लॅन प्रीपेड व पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

२. अमर्यादित ५जी डेटा: जर तुमचा स्मार्टफोन ५जी enabled असेल आणि तुम्ही जिथे राहता तिथे उत्तम ५जी नेटवर्क असेल तर तुम्ही कोणत्याही डेटा मर्यादांशिवाय या अमर्यादित ५जी डेटा प्लॅनचा लाभ घेऊ शकता.

३. २ जीबी ४ जी डेटा : जिथे ५जी नेटवर्क नसेल त्याठिकाणी युजर्सना दररोज २ जीबी ४ जी डेटा दिला जाईल.

४. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग : युजर्सना सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलची सुविधा दिली जाईल.

हेही वाचा…Jio recharge plans : ‘या’ चार रिचार्जवर मिळणार मोफत सबस्क्रिप्शन; किंमत ११०० रुपयांपेक्षा कमी

५. १०० एसएमएस : याचबरोबर तुम्हाला दिवसाला १०० एसएमएस दिले जातील.

६. फ्री रोमिंग : भारतात तुम्हीही कुठेही जाल तिथे तुम्हाला फ्री रोमिंग मिळेल.

७. सबस्क्रिप्शन : हा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) जितक्या दिवसांसाठी वैध असेल तितके दिवस तुम्हाला जिओच्या जिओ क्लाऊड, जिओ सिनेमा, जिओ टीव्हीवर मोफत प्रवेश मिळेल.

तुम्ही हा रिचार्ज कसा करू शकता ?

जिओ युजर्स माय जिओ ॲप, जिओची अधिकृत वेबसाइट किंवा एखाद्या मोबाईलमध्ये रिचार्ज करून देणाऱ्या विक्रेत्याकडून सुद्धा तुम्ही हा ९८ दिवसांच्या प्लॅन सहजपणे रिचार्ज करून घेऊ शकता.

ओटीटी रिचार्ज प्लॅन्स :

रिलायन्स जिओचा १७५ रुपयांचा महिन्याचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) १० जीबी हाय स्पीड डेटा आणि सोनी SonyLIV , झी ५, जिओ सिनेमा प्रीमियम, Lionsgate Play, यासह ११ लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देते. पण, या प्लॅनमध्ये कॉलिंग दिल जाणार नाही. तसेच हा खास प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असणार आहे.