जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक मासिक प्लान लाँच केला आहे. कंपनीचा हा प्लान २५९ रुपयांचा आहे. विशेष बाब म्हणजे हा प्लान पूर्ण एक महिना म्हणजेच ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लानमध्ये युजर्सना रिच डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सारख्या सुविधांचा लाभ मिळतो. सर्व टेलिकॉम कंपन्या आता १ महिन्याच्या नावाने २८ दिवसांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. यावर चिंता व्यक्त करत ट्रायने कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तुम्हाला प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता दिली जाते. अशा प्रकारे एकूण हाय स्पीड डेटा ४५ जीबी होतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील दिले जात आहेत. याशिवाय जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जाते. जर वापरकर्त्याने ५ मार्च रोजी नवीन २५९ रुपयांच्या मासिक प्लानसह रिचार्ज केले, तर पुढील रिचार्जची तारीख ५ एप्रिलनंतर ५ मे आणि त्यानंतर ५ जून असेल. प्लानमधील दैनिक डेटा संपल्यानंतर डेटा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत खाली येतो. या व्यतिरिक्त, प्लानमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत. या अंतर्गत वापरकर्त्यांना JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारख्या Jio अॅप्समध्ये विनामूल्य प्रवेश मिळतो.
IPL 2022: Reliance Jio ने लाँच केला स्वस्त क्रिकेट प्लान, जाणून घ्या
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जानेवारीमध्ये सांगितले होते की, दूरसंचार कंपन्यांना किमान एक प्लान व्हाउचर, एक विशेष टॅरिफ व्हाउचर आणि ३० दिवसांच्या वैधतेसह एक कॉम्बो व्हाउचर ऑफर करावे लागेल.