Jio Launched Affordable Recharge Plan : ट्रायच्या एका आदेशामुळे टेलिकॉम कंपन्यांची तारांबळ उडाली . फक्त व्हॉइस आणि एसएमएस बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करण्याच्या नादात कोणी प्लॅन्स स्वस्त केले कोणी महाग केले तर कोणी प्लॅन कायमचे बंद करून टाकले. तर आता रिलायन्स जिओने त्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन (Jio Affordable Plan) गुपचूप सादर केला आहे, ज्यात तुम्हाला महिनाभर इंटरनेट वापरता येईल.
रिलायन्स जिओने भारतात १८९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन (Jio Affordable Plan) भारतात लॉन्च केला आहे. १८९ रुपयांमध्ये, Jio तुम्हाला व्हॉईस आणि डेटाचा फायदा घेण्याची संधी देतो आहे. काही ऑनलाइन असे अहवाल सूचित करतात की, जिओ कडे १८९ रुपयांचा प्लॅन काही कारणास्तव बंद करण्यात आला होता, जो पुन्हा लाँच केला जात आहे असे म्हटले आहे.
जिओने १८९ रुपयांच्या प्लॅनसाठी एक नवीन टॅब तयार केला आहे ज्याला “affordable pack” म्हणून (Jio Affordable Plan) वर्गीकरण केले आहे. १८९ रुपयांचा हा प्लॅन २ जीबी लंपसम डेटा ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला २८ दिवसांच्या वैधतेसह एकूण २ जीबी “हाय-स्पीड” ४ जी डेटा देतो. या प्लॅनवर ५ जी उपलब्ध नाही.
१८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Affordable Plan)
१८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या कालावधीसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि २ जीबी डेटासह येतो. १९८ रुपयांमध्ये, जिओ १४ दिवसांच्या कालावधीसाठी अमर्यादित ५ जी आणि जिओ सावन प्रो सारखे ओटीटी फायदे तर प्रतिदिन २ जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर करते आहे.
हा प्लॅन अशा वेळी लाँच करण्यात आला जेव्हा अशी अफवा पसरली की, जिओ त्याच्या व्हॉइस, एसएमएस प्लॅनवर डेटाला परवानगी देत नाही या गोंधळामुळे यामुळे जिओला अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला . पण, Jio ने Financialexpress.com ला पुष्टी केली आहे की, नवीन ४४८ आणि १७४७ रुपयांच्या प्लॅनचे सदस्यत्व घेणारे ग्राहक डेटा पॅकसह रिचार्ज करू शकतात. हे डेटा पॅक, जसे की ११ रुपये, १९ रुपये आणि २९ रुपये किंमतीचे, सर्व जिओ रिचार्ज चॅनेलद्वारे उपलब्ध आहेत. TRAI च्या निर्देशानुसार व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी टेलिकॉम कंपन्यांना स्टँडअलोन स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STVs) घेणे अनिवार्य केल्यानंतर व्हॉईस आणि एसएमएस-फक्त योजना सुरू करण्यात आल्या.