प्रत्येक आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट, वेब सीरिज, शोज प्रदर्शित होत असतात. जर युजर्सनी नेटफ्लिक्स, हॉटस्टार, डिस्नी यांचे सबस्क्रिप्शन घेतले तर या वेब सीरिज, चित्रपट पाहण्याचा आनंद आणखीन द्विगुणित होतो. पण, काही रिचार्ज प्लॅन्स हे खूप महाग असतात. तसेच अनेक कंपन्यांनी पासवर्ड शेअरिंगचीसुद्धा सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे; तर आता जिओ कंपनी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत नवीन प्लॅन घेऊन आली आहे.
रिलायन्स जिओने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिओ एअरफायबरची घोषणा केली होती. काही महिन्यातच जिओ फायबर सेवा देशातील तीन हजार ९३९ शहरांपर्यंत पोहोचली. जिओ एअरफायबरच्या प्रत्येक प्लानमध्ये ग्राहकांना ओटीटी आणि टीव्ही चॅनेलसारखे बेनिफिट्स मिळतात; तर रिलायन्स जिओने आपल्या जिओ फायबर (JioFiber) आणि जिओ एअरफायबर (Jio AirFiber) ब्रॉडबँड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. नवीन जिओ फायबर आणि जिओ एअरफायबर प्लॅनची किंमत ८८८ रुपये प्रतिमहिना आहे व हा प्लॅन मंथली, सेमी-अॅन्यूअल, क्वॉर्टर्ली आणि अॅन्यूअल बेसिसवर विकत घेता येईल.
तसेच नेटफ्लिक्ससह १४ इतर ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मसह विनामूल्य सबस्क्रिप्शनदेखील ऑफर करते आहे. नवीन पोस्टपेड प्लॅन तुम्हाला 30Mbps पर्यंत डाउनलोड स्पीडसह अमर्यादित डेटा ॲक्सेस देईल. अहवालानुसार तुम्ही प्रीपेड वापरकर्ते असल्यास तुम्ही हा प्लॅन सहजतेने अपग्रेड करू शकता. नवीन प्लॅनमध्ये ८०० हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेलचाही समावेश आहे.
हेही वाचा…iPhone चार्ज करताना कव्हर काढता का? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी ॲपलने सांगितल्या ‘या’ पाच टिप्स
नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनमधून आणखी कोणत्या गोष्टींचा तुम्ही लाभ घेऊ शकता ?
१. जिओच्या नवीन प्लॅनमध्ये खाली नमूद केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे…
नेटफ्लिक्स (बेसिक), प्राइम व्हिडीओ (लाइट), जिओसिनेमा प्रीमियम, डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी फाईव्ह, सन एनएक्सटी, Hoichoi, डिस्कव्हरी प्लस, अल्ट बालाजी, इरॉस Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, ईपीकॉन (EPICON), ईटीव्ही विन (JioTv+ द्वारे) आदी ओटीटी प्लॅटफॉर्मचा या यादीत समावेश आहे.
२. या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये Jio होम ब्रॉडबँड कनेक्शनवर ‘IPL धना धना धन’ साठी ५० दिवसांचे व्हाउचरदेखील उपलब्ध आहे, जे जुन्या आणि नवीन ग्राहकांना ५० दिवसांसाठी मोफत इंटरनेटचा प्रवेश करण्यास परवानगी देईल. पण, ही मुभा फक्त ३१ मेपर्यंत वैध आहे. शिवाय नवीन ८८८ प्लॅन व्यतिरिक्त, १,४९९ रुपयांच्या प्लॅनबरोबर नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येतो. इतर प्लॅनमध्ये ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30mbs स्पीड, अमर्यादित डेटा एक महिण्यासाठी देतो . पण, या प्लॅनमध्ये १४ OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळवायचे असल्यास तुम्हाला यात १०० ते २०० रुपये अधिक खर्च करावा लागेल.