टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरातील जिओच्या वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी नवीन अमर्यादित ५ जी डेटा योजना जाहीर केल्या आहेत. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन सेवा ३ जुलै २०२४ पासून देशभरात लागू होणार आहेत. रिलायन्स जिओ हे ५ जी देशात कोठेही सर्वात फास्ट ५ जी सेवा देत आहे. जिओचे कोणते प्लॅन महाग झाले आणि जुन्या किमतीच्या तुलनेत किंमत किती वाढली आहे, याबाबत माहिती पाहूयात.

जिओ कंपनीने आपले पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन १५५ रुपयांचा होता. आता त्या प्लॅनची किंमत १८९ रुपये करण्यात आली आहे. तसेच जिओने मासिक, तीन महिन्यांचा प्लॅन आणि वार्षिक प्लॅनचे दर बदलले आहेत. हे दर आता ३ जुलैपासून लागू होणार आहेत.

आता अमर्यादित ५ जीबी डेटा हा फक्त काही वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. त्यामध्ये जिओने सर्व ग्राहकांना अमर्यादित ५ जीबी डेटा देणं बंद केलं आहे. हा लाभ फक्त काही प्लॅनवरच उपलब्ध असणार आहे.

आता कसे असणार प्लॅन?

१५५ रुपयांचा २ जीबी टेडा प्लॅनची किंमत आता १८९ रुपये करण्यात आली आहे. २०९ रुपयांच्या १ जीबी टेडा दररोजच्या प्लॅनची किंमत २४९ करण्यात आली आहे. २३९ रुपयांच्या १.५ जीबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत आता २९९ करण्यात आली आहे. २९९ च्या २ जीबी प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत आता ३४९ करण्यात आली आहे. ३४९ रुपयांच्या २.५ जीबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत आता ३९९ करण्यात आली आहे. ३९९ रुपयांच्या ३ जीबी प्रतिदिनच्या डेटा प्लॅनची किंमत ४४९ रुपये करण्यात आली आहे.

आता ५६ दिवसांच्या ५ जी अनिलिमिटेड डेली २ जीबी प्लॅनसाठी ६२९ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ३ महिन्यांच्या प्लॅनसाठी आता प्रतिदिन २ जीबी डेटासाठी आता ८५९ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच वार्षिक प्रतिदिन २.५ जीबीच्या प्लॅनसाठी ३५९९ रुपये लागणार आहेत.