Jio New Year Welcome Plan Details In Marathi : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच रिलायन्स जिओने नवीन वर्षाचे स्वागत करीत ग्राहकांसाठी नवीन ऑफरसुद्धा लाँच केली आहे. जिओने २०२५ रुपयांच्या अगदी नवीन प्रीपेड प्लॅनसह नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाली आहे (Jio New Year Welcome Plan) . या मर्यादित कालावधीच्या ऑफरमध्ये अमर्यादित व्हॉइस व ५जी डेटा आणि २,१५० रुपये किमतीचे अतिरिक्त फायदेसुद्धा देणार आहे. तर नक्की हा प्लॅन किती दिवसांसाठी वैध असेल हे आपण जाणून घेऊ…
२०२५ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना काय ऑफर देणार? (Jio New Year Welcome Plan)
२०२५ रुपयांचा हा नवीन प्लॅन दैनंदिन २.५ जीबी डेटाची ऑफर देतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर नेट वापरू शकता. तुम्हाला हा प्लॅन २०० दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस देईल. त्याचा अर्थ तुम्ही जवळपास सात महिने रिचार्जिंगची चिंता न करता, इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या एरियात जिओ वेलकम ऑफरसाठी पात्र असाल, तर तुम्हाला अमर्यादित ५जीदेखील मिळेल.
पोस्ट नक्की बघा…
तसेच Jio या प्लॅनसह २,१५० रुपयांची व्हॅल्यू बॅक कूपन (value back coupons) ऑफर करीत आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल…
१. अजिओवर जर २,९९९ रुपयांच्या ऑर्डरवर तुम्हाला ५०० रुपयांची सूट दिली जाईल.
२. EaseMyTrip.com वर फ्लाइट बुकिंगवर केल्यास १,५०० रुपयांपर्यंत तुम्हाला सूट दिली जाईल.
३. ‘स्विगी’वर ४९९ रुपयांपेक्षा पेक्षा जास्तची तुम्ही ऑर्डरसाठी दिलीत, तर तुम्हाला १५० रुपयांची सूट दिली जाईल.
ही योजना तुमच्यासाठी परफेक्ट आहे का? (Jio New Year Welcome Plan)
जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग किंवा सतत पदार्थ ऑर्डर आणि प्रवास करण्याची सवय असेल आणि तुम्हाला सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल तरीसुद्धा या प्लॅनचा आनंद घेऊ शकता. तर ही लिमिटेड टाईम ऑफर MyJio ॲप आणि जिओच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जिओचे इतर प्लॅन्स
जिओ २.५ जीबी दैनिक डेटासह आणखी तीन प्रीपेड प्लॅन ऑफर करते. त्यामध्ये ३९९, ३,५९९, ३,९९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित ५जी डेटासह २८ दिवस (एकूण ७० जीबी) मिळतात; तर ३,५९९ आणि ३,९९९च्या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. जवळपास १ टीबी वार्षिक डेटा मिळतो आणि स्पोर्ट्सप्रेमींसाठी FanCode सबस्क्रिप्शनदेखील उपलब्ध आहे.