Jio 72 Days Recharge Plan Offer : देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी म्हणून ‘जिओ’कडे पाहिले जाते. जिओकडे ४६ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनी आपल्या या मोठ्या ग्राहकवर्गाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध रिचार्ज प्लॅन्स ऑफर करीत असते, ज्याद्वारे ते बजेट फ्रेंडली प्लॅनसोबत अतिरिक्त डेटा वापरणाऱ्या युजर्सचीही ते चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतात. अलीकडे ओटीटी स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मोबाईल डेटा वापरण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून ‘जिओ’ने एक आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, जो दीर्घ वैधता, अमर्यादित कॉलिंग व अतिरिक्त डेटा उपलब्ध करून देतो.
एक नवीन रिचार्ज पर्याय
जिओच्या ऑफरमध्ये नवीन भर म्हणजे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास कमी करण्यासाठी डिझाइन केलेला रिचार्ज प्लॅन. तसेच कॉलिंग, डेटा वापर व ओटीटी स्ट्रीमिंगच्या बाबतीत एक्स्ट्रा डेटा प्रदान करणे होय. त्यामुळेच ‘जिओ’च्या ७४९ रुपये किमतीच्या या प्लॅनने असंख्य युजर्सना आकर्षित केले आहे.
७४९ रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन ७२ दिवसांची वैधता देतो, ज्यादरम्यान ग्राहकांना सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचाही आनंद घेता येतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्रियजनांशी कोणत्याही काळजीशिवाय मुक्तपणे चॅट करू शकता. त्याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात.
डेटाप्रेमींसाठी उत्तम फायदे (Jio Recharge Plan) :
आता ७२ दिवसांच्या या प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या डेटा फायद्यांबद्दल बोलूया… जिओ या प्लॅनमध्ये संपूर्ण कालावधीसाठी एकूण १६४ जीबी डेटा देते, ज्यामुळे युजर्स दररोज ब्राउजिंग, काम आणि इतर कामांसाठी दररोज २ जीबी डेटा वापरू शकतात. बोनस म्हणून जिओ अतिरिक्त २० जीबी डेटा देत आहे. तुम्ही तुमची दैनंदिन मर्यादा गाठली तरीही तुम्ही ६४ केबीपीएसच्या कमी वेगाने इंटरनेट वापरणे सुरू ठेवू शकता.
जिओच्या ७४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये काही उत्तम अतिरिक्त सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना जिओ हॉटस्टारचे ९० दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन, ५० जीबी एआय क्लाउऊड स्टोरेज मिळते. त्याशिवाय तुम्हाला जिओ टीव्हीचा मोफत ॲक्सेस मिळेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय विविध टीव्ही चॅनेल्सचा आनंद घेऊ शकाल.